नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सार्वजनिक शौचालये बांधण्याच्या उपक्रमात राजधानी दिल्लीने बाजी मारली आहे.
सार्वजनिक शौचालये बांधण्यात गुजरात राज्य सर्वांत पुढे होतं. पण सध्याच्या माहितीनुसार दिल्लीने आता आघाडी घेतली आहे.
दिल्लीत आजच्या घडीला ७५५६ सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. या शर्यतीत छत्तीसगढ दुसऱ्या स्थानावर आहे तर २५२० शौचालये उभारून महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे.
देशात २०१९ सालापर्यंत एक कोटी सार्वजनिक शौचालये उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांकडून ३० लाख खासगी शौचालये बांधण्यासाठी अर्ज आले होते त्यापैकी १३ लाख शौचालये उभारण्याची मान्यता नगर विकास मंत्रालयाने दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.