आग्रा : यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने ताजमहालचा पाया धोक्यात आला असल्याची माहिती इतिहासकार हाजी तहीरुद्दीन ताहीर यांनी दिली आहे.
ताजमहलचा पायाचा भक्कमपणा हा सर्वस्वी यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे.
पण पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असून त्याचा फटका थेट ताजमहालच्या वास्तूला बसतो आहे.
४०-५० वर्षानंतर जेव्हा ताजमहालचा खडक ओलाव्याअभावी कोरडा होईल तेव्हा तो पडायचा अधिक धोका अधिक उद्भवेल. त्यामुळे ताजमहालच्या वास्तव्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे,
यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे आहे. ताजमहालचं जतन हे करायलाच हवं अशी माहिती ताहीर यांनी आग्रामध्ये दिली.
भारताच्या पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र इतिहासकारांच्या वैज्ञानिक पुराव्याला साफ विरोध केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.