तुम्ही खाताय त्या मिठाईत भेसळ? आरोग्यावर होतोय दुष्परिणाम!

Artificial flavor in Sweets: तुम्ही जर मिठाई खात असाल तर सावधान! कारण त्यात भेसळ असू शकते.

Pravin Dabholkar | Updated: Feb 23, 2025, 08:32 PM IST
तुम्ही खाताय त्या मिठाईत भेसळ? आरोग्यावर होतोय दुष्परिणाम!
मिठाईत भेसळ

Artificial flavor in Sweets: सण समारंभ असोत वा मंदिरात जाताना देवाला प्रसाद म्हणून मिठाई खरेदी केली जाते. मात्र आता ही मिठाई खरेदी करताना, खाताना काळजी घ्या कारण त्यात भेसळ असू शकते. गोड खायला कुणाला आवडत नाही? सणवार किंवा एखादी चांगली घटना घडली की लगेच मिठाई मागवून तोंड गोड केले जातात.. इतकंच काय, तर परीक्षांचे निकाल लागोत वा मंदिरात देवदर्शनाला जायचं असेल, पेढे, मिठाई घेतले जातात. या मिठाईमध्ये महत्त्वाचा घटक असतो तो खवा..आता जे आम्ही सांगतोय ते नीट समजून घ्या. 

तुम्ही जर मिठाई खात असाल तर सावधान! कारण त्यात भेसळ असू शकते. राज्यात अनेक ठिकाणी मिठाई बनवण्यासाठी कृत्रिम खव्याचा वापर केला जातोय. युरीया वापरलेलं दूध, वनस्पती तेल वापरलेला खवा या मिठाईत असल्यातं समोर आलं आहे. केवळ मिठाईच नव्हे तर पनीर, चीज आणि आईस्क्रीम असे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठीही वनस्पती तूप, तेलाचा वापर केला जातोय.. त्यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.. 

कृत्रिम खव्यात काय असतं? 

वनस्पती तेल, तूप, भेसळयुक्त दुधापासून खव्याची निर्मिती होते. खव्यात स्टार्च, वनस्पती तूप, ब्लॉटिंग पेपर, चाक पावडरचा वापर केला जातो. कृत्रिम दुधात युरिया, कॉस्टिक सोडा, बोरिक अॅसिड, हायड्रोजन पेरॉक्साईड, स्टार्चचा वापर केला जातो. 

शरीरावर याचे वाईट परिणाम 

दुधाच्या अनालॉग पदार्थांचं प्रमाण वाढलं आहे. या दुधापासून मिठाई, पनीर, चीज बनवलं जातं. यात दूध कमी किंवा दुधाऐवजी इतर पदार्थ वापरून ते तयार केले जातात. वनस्पती तेलाचं प्रमाण यात अधिक आहे. त्यामुळे साहजिकच शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. 

यापुढे मिठाई खाताना सावध राहा

दुग्धजन्य पदार्थांची साठवणूक कशी करायची, त्याचेही काही नियम आहेत.तेव्हा यापुढे मिठाई खाताना सावध राहा, ती भेसळयुक्त नाही ना, याची खात्री करा अन्यथा आरोग्यावर दुष्परिणाम होतील, हे नक्की.

5 मिठाई आरोग्यासाठी घातक, पोट बिघडून हालत होईल खराब

मावा मिठाई

बर्फी, पेडा, खवा मिठाई आदी माव्याच्या मिठाईमध्ये भेसळयुक्त मावा किंवा सिंथेटिक मावा वापरला जातो, जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. भेसळयुक्त माव्यामुळे पोटाच्या समस्यांपासून ते अन्न विषबाधापर्यंत सर्व काही होऊ शकते. या माव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो.

चॉकलेट कोटेड मिठाई

चॉकलेट कव्हर मिठाई किंवा चॉकलेट फ्लेवर्ड मिठाई मोहक वाटू शकते. परंतु त्यामध्ये भरपूर साखर, कृत्रिम रंग आणि फ्लेवर्स असू शकतात. हे पदार्थ मुलांसाठी आणि प्रौढांसाठी हानिकारक असू शकतात, कारण ते वजन वाढवतात तसेच रक्तातील साखरेची पातळी प्रभावित करू शकतात.

चमचम आणि रसगुल्ला

रसगुल्ला आणि चमचम सारख्या मिठाई सिरपमध्ये भिजवल्या जातात आणि त्यात भरपूर साखर असते. या मिठाईच्या अतिसेवनामुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि दातांच्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय या मिठाईंमध्ये अनेकदा कृत्रिम रंग वापरले जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक असतात.

सिल्वर वर्ख मिठाई 

मिठाईवर लावलेल्या चांदीच्या वर्ख दर्जावरही प्रश्न उपस्थित केले जातात. अनेक वेळा कामात खरी चांदी वापरली जात नाही आणि त्यात हानिकारक धातू वापरल्या जातात, जे शरीरासाठी विषारी असू शकतात. यामुळे यकृत आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.

लाडू आणि जिलेबी

लाडू आणि जिलेबीसारख्या गोड पदार्थांमध्ये तेल आणि साखर भरपूर प्रमाणात असते. सण-उत्सवांदरम्यान ते मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते, ज्यामुळे वजन वाढते तसेच कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यांना आधीच हृदयाची समस्या किंवा मधुमेह आहे त्यांच्यासाठी हे विशेषतः हानिकारक आहे.