रविंद्र धंगेकर मोठा निर्णय घेणार? जायंट किलर नेत्याच्या स्टेटसमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

वनिता कांबळे | Updated: Feb 23, 2025, 08:32 PM IST
 रविंद्र धंगेकर मोठा निर्णय घेणार? जायंट किलर नेत्याच्या स्टेटसमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Ravindra Dhangekar : हू इज धंगेकर  कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात चंद्रकांत पाटलांनी विचारलेला हा प्रश्न तुम्हाला आठवत असेलच. पण आता 'व्हेअर इज धंगेकर' असं विचारण्याची वेळ आलीय. कारण रविंद्र धंगेकरांचं चाललंय तरी काय असा प्रश्न पडावा. एकनाथ शिंदेंपाठोपाठ उदय सामंतांची भेट घेतल्यापासून धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच धंगेकरांनी गळ्यात भगवी शाल टाकलेला फोटो शेअर केल्यानं या चर्चांना बळ मिळालं. मात्र आता यावर धंगेकरांनीच स्पष्टीकरण दिलंय. 

मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे. गळ्यात भगवी शाल टाकलेला फोटो हा शिवजयंतीतला आहे ..चागला फोटो वाटला म्हणून स्टेटसला ठेवला अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिलीय. मला काँग्रेसने जबाबदारी दिली नसली तरी मी नाराज नाही, मात्र येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची धंगेकरांनी सांगितलंय  'शिवजयंतीचा फोटो चांगला वाटला म्हणून स्टेटसला ठेवल्याचं धंगेकरांनी सांगितलंय. आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

धंगेकर शिवसेना प्रवेशाच्या चर्चा नाकारत असले तरी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंतांनी धंगेकरांना खुली ऑफरच दिलीय. समाजकार्य करायचं असल्यास धंगेकरांना मोठी संधी असल्याचं सामंतांनी म्हटलंय. कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळवून रविंद्र धंगेकर जायंट किलर ठरले होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे धंगेकर काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेण्याच्या चर्चांना ऊत आलाय. दरम्यान, धंगेकरांना समाजकार्य करायचं असेल तर त्यांना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात मोठी संधी आहे असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलंय