बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे खळबळ! मार्च एप्रिल महिन्यात ग्रहांची दिशा भयानक, Google वर का सर्च केली जातेय 'ही' तारीख

मार्च एप्रिल महिन्यात ग्रहांची दिशा भयानक असेल याचा संपूर्ण जगावर परिणाम होईल. प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याच्या भविष्यवाणी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.   

वनिता कांबळे | Updated: Feb 23, 2025, 08:09 PM IST
 बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे खळबळ! मार्च एप्रिल महिन्यात ग्रहांची दिशा भयानक, Google वर का सर्च केली जातेय 'ही' तारीख

Baba Vanga Predictions 2025 :  प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा याच्या भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2025 या वर्षातील मार्च आणि एप्रिल महिना महाभयानक असेल. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमुळे खळबळ उडाली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात जगाचा विनाश होईल. Google वर जगाच्या विनाशाची तारीख सर्च केली जात आहे. 

मार्च एप्रिल महिन्यात ग्रहांची दिशा भयानक असेल असे भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे. याचा परिमाण संपूर्ण जगावर होणार आहे. मार्च महिन्यात जागतिक स्तरावार मोठ्या घडामोडी घडतील. मार्च 2025 मध्ये पूर्वेकडे संघर्ष सुरू होईल, ज्याचे पश्चिमेकडे दूरगामी परिणाम पहायला मिळतील. यापूर्वी देखील बाबा वेंगाने या संभाव्य धोक्याचे भाकित वर्तवले होते.  2025 पासून रशिया युक्रेन युद्ध संपवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करेल. मार्च महिन्यात जगात तिसरे महायुद्ध सुरु होईल. पूर्वेकडे सुरु होणारे हे युद्ध पश्चिमेचा नाश करेल असे भाकित बाबा वेंगाने वर्तवले आहे. या युद्धामुळे पृथ्वीवर मोठी आपत्ती येईल असे सांगत बाबा वेंगाने मोठ्या प्रमाणात विनाश होण्याची भविष्यवाणी केली आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती बनतील. मार्च महिन्यात संपूर्ण युरोपला मोठ्या अशांततेचा सामना करावा लागेल. 2025 मध्ये मानवी जीवितहानी व्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात विस्थापन आणि विध्वंस होईल. एप्रिल महिन्यात अनेक मोठ्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात असेही बाबा वेंगाचे भाकित आहे. प्रलयाचा दिवस जवळ आला आहे. जगभरात डूम्स डे अर्थात प्रलयाचा दिवसाची तारीख गुगलवर सर्च केली जात आहे. 

बाबा वेंगाने दुसऱ्या महायुद्धाबाबतचे भाकीत केले होते. हे भाकित खरे ठरले  होते. अमेरिकेत झालेला 11/11 हल्ला, स्टॅलिन या रशियन क्रांतिकारक आणि राजकारणाच्या मृत्यूची तारीख, उत्तर बल्गेरियात येणाऱ्या भूकंपांचे भाकित अशा अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. 

बाबा वेंगा हा नेत्रहीन आहे. 911 मध्ये बाबा वेगांचा जन्म आणि मृत्यू 1996 मध्ये झाला होता. पण बाबा वेंगानं मरण्यापूर्वी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केलीय. प्रत्येक वेळी बाबावेंगाची भाकितं खरी ठरतीलच असं नाही, अनेकदा भाकितं खोटी ठरतात. तरीही बाबा वेंगाच्या भाकितांची नेहमीच चर्चा असते.