Chhaava Rashmika Mandana Yesubai saree : फाड देंगे मुगल सल्तनत की छाती, अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की...मोघलांना आपल्या याच पराक्रमाने चितपट करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द छावाच्या रुपाने रूपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. मराठी जनांसह देशभरात सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अभिनेता विकी कोशलने सिनेमात संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जीवंत केल्याचं म्हणत प्रेक्षकांनी कौतुक केले. तर, राणी येसूबाईच्या भूमिकेतील रश्मिका मंदानानेही प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. 'येसूबाईं'च्या लुकसाठी प्रचंड मेहनत गेण्यात आली आहे. छावा चित्रपटात रश्मिकाने परिधान केलेली पैठणी आणि नारायण पेठ साडीची डिजाईन 500 वर्ष जुनी आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून अनेकांच्या डोळ्यातून अक्षरक्षा अश्रूधारा वाहत असल्याचेही पाहायला मिळाले. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य या चित्रपटाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवलं जातंय. छावा चित्रपटात अनेक मराठी कलाकारांना घेऊन दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची यशोगादा अगदी तळमळीने मांडल्याचं दिसतं आहे. चित्रपटाच्या कथेसह या सिनेमातील सर्वच कलाकारांच्या लुकची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा विकीसोबत औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरुवातीला लोक अभिनेत्याला ओळखू शकले नाहीत. पण जेव्हा नंतर हे उघड झाले की ही भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्ना आहे, तेव्हा सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला. येसूबाईंचे पात्र साकारणाऱ्या रश्मिकाचा लूक देखील लक्ष वेधून आहे.
रश्मिकाने संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईची भूमिका साकारली आहे. रश्मिकाच्या लूकसाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका तथा कॉस्ट्यूम डिजाइनर शीतल शर्मा यांनी प्रत्येक कलाकाराचे कॉस्ट्यूम डिजाइन केले. यासाठी त्यांनी संभाजीनगर, रत्नागिरी, पुणे, नाशिक, पैठणसह महाराष्ट्रातील अनेक शहरांना भेटी दिल्या.
छावा चित्रपटात रश्मिकाने पैठणी आणि नारायण पेठ साड्य़ा परिधान केल्या आहेत. येसूबाईंच्या काळात पैठणी आणि नारायण पेठ साड्यांचे डिजाईन कसे होते हे जाणून घेण्यासाठी अनेक संग्रहालयांना भेट दिली. साड्यांचे काठ तसेच रंगसंगतीनुसार 500 वर्ष जुन्या डिजाईन नुसार साड्या तयार करण्यात आल्या. जुन्या डिजाईनच्या नऊवारी साडीप्रमाणेच संग्रहालयात असलेल्या दागिन्यांच्या आधारे रश्मिकाचे दागिने डिझाइन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.