नवी दिल्ली : डिझेल आणि पेट्रोलच्या ग्राहकांना विधानसभा निवडणुकीआधीच खुशखबरी मिळणार आहे... कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत घट होण्याची शक्यता निर्माण झालीय.
‘इकोनॉमिक टाईम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुकीपूर्वीच डिझेलचे दर प्रति लिटर दोन रुपयांपर्यंत कमी होणार आहेत. असं झालं तर, सात वर्षांत पहिल्यांदाच डिझेलचे दर कमी होतील. यासोबतच पेट्रोलच्या दरांतही 50 पैशांनी घट होऊ शकते.
पण, यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर राहणं किंवा कमी होणं गरजेचं आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 14 महिन्यांतील न्यूनतम स्तरावर आहे. ब्रेंट क्रूड कमी होऊन आता 96.7 डॉलर प्रति बॅरलवर पोहचलंय.
दरम्यान, सरकारनं निवडणुकीच्या कारणास्तर गॅसचे दर वाढवण्याचा निर्णय मागे टाकलाय. नव्या किंमतीच्या नीतिसहीत दिल्लीच्या सीएनजी दरांमध्ये 2.81 रुपये प्रति किलो आणि पीएनजीचे दरांत 1.89 रुपये प्रति किलो वाढ होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.