त्रिवेंद्रम : ख्राईस्ट कॉलेजमधील बायोडायव्हर्सिटी रिसर्च सेंटरच्या काही संशोधकांनी कोळ्यांच्या सहा नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. या प्रजातींमध्ये ख्रिसो, टेट्नाग्नाथा, ट्नॅचेलास तसेच अॅर्जिरोड्स या जातींमधील कोळी आहेत.
संशोधकांनी अशा सहा निरनिराळ्या प्रजातींवर संशोधन केले आहे. यात ख्रिसो या जातीतील कोळी अतिशय लहान असून मुख्यतः गवतात आढळतात.
टेट्नाग्नाथा या जातीचे कोळी लांब पंजांचे असतात. त्यांचा रंग पिवळा असून त्यांच्या पाठीवक काळे ठिपके आढळतात.
जगातील सगळ्यात विषारी कोळ्यामध्ये अॅर्जिरोड्स या जातीचा समावेश होतो. याला ड्युड्रॉप्स कोळी असेही बोलतात. उष्ण कटीबंध हे कोळी जास्त आढळतात.
संशोधकांना या सहा प्रजाती हरित वनात सापडल्या आहेत. यांवर अजून संशोधन चालू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.