नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही आठवड्यांपासून वाढ दिसतेय. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी तसेच लग्नसराईचा मोसम सुरु असल्याने वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतींने गेल्या नऊ आठवड्यातील उच्चांकी स्तर गाठला. सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी २७ हजार ७०० रुपयांवर पोहोचला.
चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजार, कच्च्या तेलांच्या किंमतीत सातत्याने होत असलेली घसरण आणि डॉलरचा कमकुवतपणै यामुळे सोन्याच्या दरात वाढ होतेय. दुसरीकडे स्थानिक सराफा बाजारत लग्नसमारंभाचा मोसम असल्याने मागणीही वाढलीये.
आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोने 1,173.50 डॉलर प्रति औंस इतके तर चांदी 15.01 डॉलर प्रति औँस इतकी होती. मुंबईतही आज सोन्याचे भाव चढे राहिलेत.
आज काय आहेत मुंबईचे दर