ऋषभ पंत प्रमाणे आणखीन एका स्टार क्रिकेटरचा भीषण अपघात, कारची अवस्था पाहून फॅन्सना धक्का

Nkrumah Bonner Accident : भारतीय वेळेनुसार पहाटे 2 च्या सुमारास अपघात झाला असून त्याने यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात अपघातामुळे त्याच्या गाडीचा झालेला चुराडा पाहून क्रिकेट चाहत्यांना ऋषभ पंतचीच्या कार अपघाताचीच आठवण झाली. 

पुजा पवार | Updated: Nov 18, 2024, 03:43 PM IST
ऋषभ पंत प्रमाणे आणखीन एका स्टार क्रिकेटरचा भीषण अपघात, कारची अवस्था पाहून फॅन्सना धक्का  title=
(Photo Credit : Social Media)

Nkrumah Bonner Accident : वेस्ट इंडिजचा 35 वर्षीय स्टार ऑलराऊंडर नक्रुमाह बोनर (Nkrumah bonner) याच्या कारला सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी भीषण अपघात झाला. भारतीय वेळेनुसार पहाटे 2 च्या सुमारास त्याचा अपघात झाला असून त्याने यानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यात अपघातामुळे त्याच्या गाडीचा झालेला चुराडा पाहून क्रिकेट चाहत्यांना ऋषभ पंतचीच्या (Rishabh Pant) कार अपघाताचीच आठवण झाली. 

वेस्ट इंडिजसाठी मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करणाऱ्या आणि लेगस्पिन गोलंदाजी करणाऱ्या नक्रुमाह बोनरने 2011 मध्ये T20I मध्ये पदार्पण केले. मात्र तो त्यात फार यशस्वी ठरला नाही. त्यामुळे पुढचे 10 वर्ष त्याने जमैकामध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळण्यात घालवले. मात्र कोरोना काळात इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी त्याची वेस्ट इंडिजच्या टेस्ट संघात त्याची निवड झाली होती. 

कार अपघाताचा फोटो केला शेअर : 

ऑल राउंडर नक्रुमाह बोनरच्या कारला पहाटे 2 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातातून नक्रुमाह बोनर हा बचावला आणि त्याला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच बोनरने स्वतः इंस्टाग्रामवर अपघात झालेल्या गाडीचा फोटो शेअर केला. यावर त्याने लिहिले की, 'देवा तुझे धन्यवाद! मी जिवंत आहे'. बोनरने पोस्ट केलेल्या फोटोत अपघातानंतर त्याच्या कारचा संपूर्ण पुढचा बंपर आणि हुड चिरडलेला दिसत आहे. हा फोटो पाहून त्याच्या फॅन्सना धक्का बसला. भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत याचा सुद्धा 2022 च्या डिसेंबरमध्ये असाच अपघात झाला होता. या अपघातात पंतची कार जळून खाक झाली होती आणि पंतला सुद्धा गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे पुढील जवळपास 15 महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. 

Nkrumah Bonner

हेही वाचा : Photo : एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेले 'हे' 5 स्टार क्रिकेटर्स मेगा ऑक्शनमध्ये राहतील Unsold

नक्रुमाह बोनरची कारकीर्द : 

नक्रुमाह बोनर शेवटी प्रसिद्धीच्या झोतात तेव्हा आला जेव्हा त्याने 86 धावा केल्या होत्या. यावेळी त्याने काइल मायर्स (210*) सोबत बांगलादेश विरुद्धच्या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजला 395 धावांचा पाठलाग करण्यास मदत केली होती. टेस्ट क्रिकेटच्या पदार्पणात बोनरने केलेल्या या कामगिरीनंतर तो वेस्ट इंडिजच्या संघात नियमित झाला. 15 कसोटी डावांमध्ये 38.23 च्या सरासरीने 803 धावा केल्या आहेत. यात 123 धावा हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. बोनरने ६ वनडे सामन्यात 85 तर 2 टी २० मध्ये 27 धावा केल्या आहेत. तर टेस्ट आणि वनडेत त्याने प्रत्येकी 1 विकेट घेतली.