महादेव मुंडे हत्याप्रकरणाला वेग, विशेष पथकाकडून 50 अधिक जणांची चौकशी

परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासणीसाठी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे परळीत दाखल झाले असून तपासाला वेग आला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 20, 2025, 03:48 PM IST
महादेव मुंडे हत्याप्रकरणाला वेग, विशेष पथकाकडून 50 अधिक जणांची चौकशी

Beed Crime : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच 14 महिन्यापूर्वी परळीत महादेव मुंडे यांचा खून झाल्याचे प्रकरण पुढे आले आहे. महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एक पथक स्थापन केलं आहे. सुरेश धस यांच्यापासून अंजली दमानिया आणि अनेक नेत्यांनी महादेव मुंडे यांच्या खुनाच्या प्रकरणाची तपासाची मागणी केली आहे. 

परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता 15 महिने उलटले असून अद्याप आरोपी फरार आहे. अद्याप या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून होऊ शकला नाही. या प्रकरणी महादेव मुंडेंच्या पत्नी सतत पोलीस ठाण्यात येत होत्या. मात्र, तपास होत नसल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. 

विशेष पथकाकडून 50 हून अधिक जणांची चौकशी 

महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. एसआयटीकडून परळीतील 50 जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या प्रकरणात 5 सदस्यीय विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पोलीस उपाअधिक्षक अनिल चोरमले यांनी तपासाचे सूत्र हाती घेतले आहे. महादेव मुंडे यांचा खून कोणी कोली? नेमकं कारण काय होते? या सर्व प्रश्नाची झाडाझडती सुरु झाली आहे. या प्रकरणी 50 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. 

पोलीस उपअधीक्षकांच्या मदतीसाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. महदेव मुंडे हत्या प्रकरणाकडे नवनीत कावंत विशेष लक्ष देत असून पथक परळीत तळ ठोकून आहे. या पथकाकडून कमालीची गुप्तता बाळगली जात आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपी निष्पन्न करण्यासाठी विशेष पथकाकडून शोध घेतला जात आहे. 15 महिन्यांपासून या प्रकरणातील आरोपी फरार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.