रोल्स रॉयस गाडी खरेदी करणारी पहिली भारतीय अभिनेत्री माहितीये का? फक्त 1200 रुपये होता पगार

Bollywood's First Actress Who Bought Rolls Royce :  बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री जिनं सगळ्यात आधी घेतली रोल्स रॉयस गाडी

दिक्षा पाटील | Updated: Feb 20, 2025, 04:39 PM IST
रोल्स रॉयस गाडी खरेदी करणारी पहिली भारतीय अभिनेत्री माहितीये का? फक्त 1200 रुपये होता पगार
(Photo Credit : Social Media)

Bollywood's First Actress Who Bought Rolls Royce : 1950 च्या दशकात इराकची राजधानी बगदादमधून मुंबईत एक अशी अभिनेत्री आली जिनं सगळ्यांच्या मनावर राज्य केलं. एकीकडे जेव्हा अभिनेत्री या साध्या रहायच्या तेव्हा ही अचानक एक बोल्ड मुलगी आणि वॅम्पच्या भूमिकेनं सगळ्यांना हैराण करून गेली. तुम्ही विचार करत असाल की ती कोण आहे. तर ती दुसरी कोणी नसून 'मुड मुड कर न देख...' फेम नादिरा होती. तिनं काहीच चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

नादिरा या त्याच्या दमदार अशा भूमिकांसाठी ओळखल्या जात होत्या. नादिरा या हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या अशा अभिनेत्री होत्या, ज्यांच्याकडे सगळ्यात महागडी गाडी अर्थात रॉल्स रॉयस खरेदी केली होती. नादिरा यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांचा जन्म हा 5 डिसेंबर 1932 मध्ये एका ज्यू कुटुंबात झाला. तर त्यांचं खरं नाव फ्लोरेन्स एझेकिएल होतं. परंतू त्या रुपेरी पडद्यावर नादिरा म्हणून लोकप्रिय झाल्या. 'मुड मुड के ना देख...' हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हा त्या फक्त 23 वर्षांच्या होत्या. त्यांच्या सौंदर्यानं प्रेक्षकांची मने जिंकली होती. 

नादिरा यांनी चित्रपटांमध्ये त्यांच्या बोल्ड भूमिकांसोबत फियरलेस अंदाजासाठी ओळखतात. पण राज कपूरसोबत काम करण्याची त्यांच्या जिद्दीनं त्यांत्यात सतत बदल व्हायचे. या निर्णयामुळे पहिला चित्रपट सुपरहिट देणाऱ्या पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायिकेच्या रूपात समोर आल्या. नादिरा पहिल्यांदा 10 वर्षांची असताना हिंदी चित्रपट 'मौज' मध्ये दिसली. त्यानंतर 'आन' चित्रपटासोबत इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात नादिरा यांच्यासोबत दिलीप कुमार यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. 'आन' या चित्रपटाचे दिग्दर्शन महबूब खान यांनी केले होते.

त्यांना आधी नरगिस यांना घ्यायचं होतं, पण त्यावेळी राज कपूर यांच्यासोबत 'आवारा' या चित्रपटाची शूटिंग करत होत्या. अशआत महबूब खान यांचं लक्ष नादिरा यांच्यावर पडलं, त्यावेळी त्या देखील कामाच्या शोधात होत्या. त्यानंतर महबूब खान यांनी लगेच त्यांना 'आन' या चित्रपटासाठी कास्ट केलं. त्यांनी फ्लोरेंस एजेकिलला नादिरा नाव दिलं होतं. 'आन' येताच थिएटर्समध्ये लोकप्रियता मिळवली आणि बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली. त्यानंतर नादिरा यांनी 'वारिस', 'जलन', 'नगमा', 'डाक बाबू' आणि 'रफ्तार' सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्यानंतर असं काही झालं की अचानक त्यांचं करिअर हे डबघाईला आलं. 

हेही वाचा : Chhaava मधील 'कवी कलश' यांनी थिएटरमध्ये सादर केलं अश्रूंचा बांध फोडणारं 'ते' काव्य; VIDEO पाहून अंगावर येतील शहारे

1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'श्री 420' मध्ये नादिरा एक क्लब डान्सरच्या रुपात दिसल्या. चित्रपटात उत्तम अभिनय केला. त्यांच्या करिअरच्या या स्तरावर त्या सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्रींपैकी एक ठरल्या. असं म्हटलं जातं की नादिरा यांनी जेव्हा चित्रपटांमध्ये काम करण्याला सुरुवात केली, तेव्हा त्यांना 1200 रुपये मानधन मिळायचं. त्यानंतर त्यांची माधनध वाढवून 2500 रुपये करण्यात आलं. जशी वेळ जात होती त्याप्रमाणे तिच्या करिअरचा ग्राफ हा वाढत होता. 3600 रुपये त्या मानधन म्हणून घेऊ लागल्या. अनेकदा त्यांची आई अचानक इतके पैसे पाहून आश्चर्यचकीत व्हायच्या. त्यांची आई त्यांना म्हणायची की तू कुठून पैसे चोरून तर आणत नाहीस ना. नादिरा यांनी इतके पैसे कमावले होते की त्या शाही आयुष्य जगायच्या आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे वागायचा. बॉलिवूडमध्ये असलेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. ज्यांनी सगळ्यात आधी जगातील सगळ्यात महागडी गाडी Rolls Royce खरेदी केली होती.