कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या एका वॉटर पार्कमधील चेंजिंग रूममध्ये छुपा सीसीटीव्ही असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोलकातामधील सर्वात मोठ्या 'एक्वाटिया' वॉटर पार्कमध्ये हा प्रकार घडला आहे. महिलांच्या चेंजिंग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सापडल्याने व्यवस्थापकासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मंगळवारी या वॉटर पार्कमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्टसुद्धा दौरा करणार आहेत.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकाराबाबत रविवारी काही जणांना अटक झाली आहे. यापूर्वी वॉटर पार्कमध्ये आलेल्या काही महिलांनी चेंजिंग रूममध्ये कॅमेरा असल्याच तक्रार केली होती. त्यानंतर कॅमेरा जप्त करणायात आला आहे. व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं आहे.
तसेच सहा सुरक्षा रक्षक आणि एका कर्मचाऱ्याला सोमवारी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांविरोधात महिलांसोबत गैरवर्तवणूक करण्याचा आरोप आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.