नवी दिल्ली : इसिस दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी तयार असल्याचं सोशल मीडियावर जाहीररीत्या सांगणाऱ्या झुबेर खानला दिल्ली एटीएसने नवी दिल्लीत अटक केली.
झुबेर खान हा पत्नी आणि दोन मुलांसह नवी मुंबईतील खारघरच्या सेक्टर १३ मधील नीलम हाइट्स या इमारतीत वास्तव्यास होता. झुबेरची पत्नी ही शाळेत शिक्षिका आहे, अशी माहिती समोर येतेय.
झुबेर स्वत:ची ओळख पत्रकार म्हणून सांगायचा. त्याच्या हालचाली काही वर्षांपासून संशयास्पद होत्या. चार दिवसांपूर्वीच त्यानं 'मी ISIS जॉइन करतोय' असा ब्लॉग लिहीला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.