नवी दिल्ली : पेट्रोलच्या किंमतीत वाढ होऊन एक दिवस होत नाही तोच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती स्वयंपाक गॅस दरवाढ करण्यात आली आहे. 16.50 रुपये दराने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईचा आता भडका उडाला आहे.
घरगुती सिलिंडरबरोबरच जेट इंधनाचीही किंमत वाढविण्यात आली आहे. या नव्या निर्णयामुळे दिल्लीमधील विनाअनुदानित सिलिडरची किंमत 922.50 रुपये इतकी झाली आहे. तेल कंपन्यांना सततच्या सोसाव्या लागणाऱ्या तोट्यामुळे ही नवी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ अखेर झालीच... पेट्रोल 1 रुपया 69 पैशांनी तर पेट्रोल 50 पैशांनी महाग झालंय. सोमवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झालीये. इराकमधल्या युद्धजन्य स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.