नवी दिल्ली : केरळमध्ये सरकारी दुकानांमधून मॅगी हद्दपार करण्यात आली आहे. तसेच मॅगीचे तपासणी केलेले नमुने आरोग्यास धोकादायक असल्याचा निर्वाळा दिल्ली सरकारने दिला आहे.
मॅगीबाबत चित्र स्पष्ट होईपर्यंत केरळमधील सरकारी दुकानांमधून विक्री तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये मॅगीचे नमुने तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मॅगीच्या १३ पैकी १० पाकिटांमध्ये शिसांचे अतिरिक्त प्रमाण आढळल्याचं दिल्ली सरकारने नमूद केलं आहे. त्यामुळे आरोग्यास घातक पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी नेस्ले कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. तर पाकिटावर उल्लेख न केलेल्या एमएसजीचं प्रमाण ५ नमुन्यांमध्ये आढळल्यामुळे दंड आकारण्याचाही विचार करत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.