पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी हे सध्या वादग्रस्त विधानांमुळं देशभरात चर्चेचा विषय झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी डॉक्टरांबद्दल वादग्रस्त विधान करून नव्यानं चर्चेला विषय पुरवला आहे. गरीबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचं हात तोडायला हवेत असं विधान मांझी यांनी केलं आहे.
या आधी त्यांनी लहानवयात लग्न केल्यानं उंची खुंटत असल्याचा शोध लावत चर्चेला विषय पुरवला होता. तर आत्ता थेट डॉक्टरांच्या हात तोडण्याबद्दल भाष्य केल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
मोतीहारी जिल्ह्यातील एका सभेत बोलताना मांझी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी मांझी यांनी असं म्हटलं की, ज्यावेळी मी पाटणा इथल्या औषध घोटाळ्याचा शोध लावला त्यावेळी मी अनेक अधिकाऱ्यांना घरी बसवलं. तसंच पीएमसीएच घोटाळ्याबाबतही मी कडक पावलं उचलली होती.
तेव्हा गरीबांचा इलाज करण्यात जर कोणत्या डॉक्टरनं हलगर्जीपणा केला तर त्याचे हात तोडून टाकले जातील, असं वादग्रस्त विधान मांझी यांनी केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.