www.24taas.com, भोपाळ
नेतेमंडळी काही विचित्र वक्तव्य करतात हे गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात अजित पवार यांचे उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. पण भोपाळमधील आदिवासी कल्याण मंत्री विजय शहा यांनी हद्द केली. त्यांनी झाबुआ येथे शेकडो विद्यार्थीनी आणि शिक्षकांसोबत अश्लिल भाषण केले.
यावेळी सुरूवातील शहा यांनी आदिवासी भागातील योजनांची माहिती दिली. नंतर त्यांनी व्यासपीठावर असलेल्या एकाच नावाच्या दोन महिला नेत्यांवर आपत्तीजनक वक्तव्य केले. ते म्हणाले, वाटते की, झाबुआमध्ये एकावर एक फ्री मिळतं वाटतं. शहा येथेच थांबले नाही. त्यांनी समोर बसलेल्या मुलींकडे इशारा करून म्हटले की पहिलं-पहिलं प्रकरण असते ते कोणी विसरू शकत नाही. विसरू शकतो का? मुले समजू शकतात. मुलांच्या हसण्यावर ते म्हणाले मुले समजदार आहे. त्यानंतर त्यांनी लगेच सावरत ते म्हणाले, पहिलं पहिलं प्रकरण म्हणजे पहिल्यांना मंत्रीपद मिळणे हेच आहे.
हास्यरंजनात गुंग झालेल्या मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही सोडले नाही. शहा म्हणाले, मी एकदा चौहान यांच्या पत्नीला म्हटले, भावासोबत रोज रोज जातात, कधी दीरासोबतही येत जा....
शहा यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी वक्त केली आणि मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान , शहा यांनी या प्रकरणाची माफी मागितली आहे.