छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १३ जवान शहीद

छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांशी सीआरपीएफच्या जवानांशी झालेल्या चकमकीत ११ जवान आणि २ अधिकारी शहीद झाले आहेत. गस्त घालणाऱ्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्लात ११ जवान शहीद झाले आहेत.

Updated: Dec 1, 2014, 06:19 PM IST
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १३ जवान शहीद title=

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांशी सीआरपीएफच्या जवानांशी झालेल्या चकमकीत ११ जवान आणि २ अधिकारी शहीद झाले आहेत. गस्त घालणाऱ्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्लात ११ जवान शहीद झाले आहेत.

जवानांवर दुपारी ४ वाजता हा नक्षलवादी हल्ला करण्यात आला आहे. सुकमात १२० जवान अडकले असल्याचं सांगण्यात येत आहे. सुकमात जवानांना खोटी माहिती देऊन अडकवण्यात आलं आहे. अंधार पडल्यानंतर सायंकाळी सहा वाजता नक्षलवादी आणि जवान यांच्यातील चकमक थांबली आहे.

या ठिकाणी नक्षलवादी असल्याची माहिती सीआरपीएफला देण्यात आली, यानंतर दीडशे ते दोनशे सीआरपीएफचे जवान त्या ठिकाणी दाखल झाले, मात्र त्या ठिकाणी ३०० ते ३५० नक्षलवाद्यांनी जवानांना घेरून त्यांच्यावर फायरिंग करण्यास सुरूवात केली आहे. 

यात आतापर्यंत १३ जवान शहीद झाले असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी आणखी १२० जवान नक्षलवाद्यांच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत.

केंद्र सरकारमध्ये एनडीए सरकार आल्यानंतर नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे, यावर केंद्र सरकार काय उपाय योजना करणार आहे, याकडे सर्वांची नजर लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.