पेट्रोल आणि डिझलची किंमत २ रुपयांनी होणार कमी?

सामान्य माणसासाठी एक खूश खबर... येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ रुपयांची कपात होण्याची केली आहे. नव्या किंमती ३० नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 26, 2014, 05:03 PM IST
पेट्रोल आणि डिझलची किंमत २ रुपयांनी होणार कमी? title=

नवी दिल्ली : सामान्य माणसासाठी एक खूश खबर... येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ रुपयांची कपात होण्याची केली आहे. नव्या किंमती ३० नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.

ही कपात झाल्यात केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून पेट्रोलच्या दरात सातव्यांदा आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा घट करण्यात आली आहे. या पूर्वी महिन्याच्या सुरूवातीला पेट्रोलच्या किंमतीत २.४१ रुपये प्रति लीटरने तर डिझेलच्या किंमतीत २.२५ रुपये प्रति लीटर घट झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून आलेल्या घटीमुळे ही कपात होऊ शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.