नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार आहेत, पेट्रोल आणि डिझेलवरील एक्झाइज ड्युटी अर्थात उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याने सर्वांना दिलासा मिळाला होता. पेट्रोलवर 2.25 रुपये प्रति लिटर तर डिझेलवर एक रुपया प्रति लिटर एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
मात्र वाढलेल्या कराचा भार ग्राहकांवर टाकला जाणार नाही, असं सुत्रांचं म्हणणं आहे.
सरकारने मागील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी 1.5 रुपये प्रति लिटरने वाढवली होती, जेणेकरुन 13000 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल.
आताही इक्साइज ड्युटी वाढवण्यामागचा हेतू हा अतिरिक्त महसूल मिळवण्याचा पर्याय असल्याचं सांगितलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.