मुंबई : भारतात वाघांची संख्या २०१० च्या १७०० तुलनेत २६६६ झाली असल्याचे समोर आले असताना एक जबरदस्त व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणथंबोरच्या जंगलात एका १७ वर्षीय वाघीणी मच्छलीने एका १४ फूटांच्या मगरीवर हल्ला केला आणि तिला ठार मारले.
वाघांची संख्या वाढण्याचे प्रमुख कारण त्यांची लढण्याची क्षमता असल्याचे जाणकारांचे मत आहे. रणथंबोरच्या पाण्याच्या तळ्यावर मोठ्या प्रमाणात मगरी आहेत. पण या मगरींनी या भागातील हरणांची मोठ्या प्रमाणात शिकार केली आहे. त्यामुळे आपला हिस्सा मगरी घेत असल्याने वाघांची शिकारी वृत्ती आणि क्षमता वाढीस लागली आहे. त्यामुळे आपल्या भक्षाला खाणाऱ्या मगरींवरच आता वाघांचे हल्ले वाढले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.