नवी दिल्ली : पाण्याची बाटली आणि कोल्ड ड्रिंक छापील किंमत म्हणजेच MRPपेक्षा जास्त रकेमला विकल्यास विक्रेत्याला तुरुंगवास आणि मोठ्या रकमेचा दंड होणार आहे. ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी हे वक्तव्य केलं आहे.
विमानतळ, मल्टीप्लेक्स आणि हॉटेल विक्रेत्यांवरही या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत. ग्राहकांनी तक्रार केली तर आम्ही नक्कीच अशी कारवाई करू असं पासवान म्हणाले आहेत.