www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा थरूर यांचा मृत्यू, विषबाधेमुळे झाला असल्याचं एसडीएम रिपोर्टमध्ये म्हटलंय. सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या या दिशेने तपास करणे गरजेचे असल्याचं जिल्हा सत्र न्यायाधीश अलोक शर्मा यांनी म्हटलं आहे.
पुष्कर यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट सोमवारी एसडीएमकडे पाठवण्यात आला. सुरूवातीला हा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. सुनंदा पुष्कर यांच्या अंगावर जखमाही आढळून आल्या होत्या.
एम्स रूग्णालयाकडून एसडीएमकडे हा रिपोर्ट पाठवण्यात आला होता. हा रिपोर्ट उघड करण्यास यापूर्वी एम्सनेही नकार दिला होता. सुधीर के गुप्ता यांच्यासह तीन डॉक्टरांच्या टीमने हे पोस्टमार्टम केलं.
सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील लीला हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळून आलं होतं. सुनंदा यांच्या हॉटेलच्या खोलीतून अलप्रॅक्स टॅबलेटच्या दोन स्ट्रीप्स आढळून आल्या होत्या.
सुनंद पुष्कर यांनी आपले पती शशी थरूर यांचं पाकिस्तानी महिला पत्रकारासोबत अफेयर सुरू असल्याचा आरोप केला होता. मात्र या महिला पत्रकाराने हे आरोप फेटाळून लावले होते.
आपले पती शशी थरूर यांना सोडचिठ्ठी देणार असल्याचंही सुनंदा पुष्कर यांनी म्हटलं होतं. मात्र नंतर शशी थरूर आणि सुनंदा थरूर यांनी आपण कायम सोबत राहणार असल्याचं सर्वांसमोर सांगितलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.