नवी दिल्ली : केंद्र सरकार येत्या १५ नोव्हेबरपासून सर्व्हिस टॅक्सवर अर्धा टक्के सेस लागू करणार आहे. त्यामुळे सर्व वस्तू आणि सेवा महागणार आहे. त्यामुळे येत्या दिवाळीनंतर सर्वांचं दिवाळं होणार आहे.
15 नोव्हेंबरपासून सेस लागू करण्यात येणार आहे.. हा निधी स्वच्छ भारत अभियानासाठी वापरणार असल्याचं केंद्राकडून सांगण्यात आले आहे. पण यापूर्वीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य जनतेला आणखी एक दणका बसणार आहे.
बातमीतील ठळक मुद्दे
- केंद्र सरकार अर्धा टक्के सेस लागू करणार
- 15 नोव्हेंबरपासून सेस लागू होणार
-निधी स्वच्छ भारत अभियानासाठी वापरणार
- सेवा कर वाढल्यानं सर्वच गोष्टी महागणार
- हॉटेलिंग,विमान, ऑनलाइन रेल्वे तिकीट महागणार
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.