यादवाड, कर्नाटक : छत्रपती शिवाजी महाराज यांची भारतात अनेक ठिकाणी स्मारक आणि शिल्प आहेत. पण शिवाजी महाराजाचं पहिलं शिल्प कुठ आणि कसं आहे याबाबत काही अभ्यासक सोडल्यास अनेकांना याची माहिती सुद्धा नाही. अशा या शिल्पाची माहिती जगासमोर आणणारा 'झी मीडिया'चा हा एक्सक्युझीव्ह ग्राउंड रिपोर्ट..
छत्रपती शिवाजी महाराज हे इ.स १६७८ मध्ये दक्षिण दिग्विजय करुन महाराष्ट्रात परत येत असताना कर्नाटकातील गदग प्रातांतील बेलवडी या छोट्या गढीस वेढा घातला. इथे झालेल्या लढाईत मल्लाबाई देसाई हिने आपल्या महिला सैन्यासह मोठ्या धैर्यानं झूंज दिली. पतीच्या निधनानंतर मोठ्या धिरानं मराठी सैन्याशी दोन हात करणाऱ्या मल्लाबाईला तिचे राज्य मुलांच्या दुधभातासाठी म्हणून महाराजांनी परत दिलं. त्याचबरोबर स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मल्लाबाईला सावित्री म्हणून गौरवलं. शिवरायांची ही आठवण कायमस्वरुपी लक्षात राहावी म्हणून मल्लाबाईने शिवरायांच्या हयातीत हे जगातील पहिलं शिल्प बनविलं.
धारवाडच्या उत्तरेस यादवाड हे छोट गावं आहे. या गावातील एका मंदिरात हे शिवाजी महाराजाचं काळा पाषानातील शिल्प आडवं ठेवण्यात आलं आहे. या शिल्पाची उंची तीन फूट आणि रुंदी अडीच फूट इतकी आहे. हे शिल्प दोन भागात विभागलेले आहे.
या शिल्पाचा इतिहास इथल्या ग्रामस्थांना माहीत नसल्यामुळं ते या शिल्पाची देखभाल म्हणावी तसी करत नाहीत, त्यामुळं शिवाजी महाराजाचे हे शिल्प कालांतराने नामशेष होईल का, अशी भिती निर्माण झाली आहे.
यादवाडचे ग्रामस्थ हनुमाणाच्या मंदिराबरोबर या शिल्पाची रोज पुजाअर्चा करतात. हणुमानाचे मंदिर बांधकामाचे काम सुरु असल्यामुळं या शिल्पाला एका कोपऱ्यात जागा देण्यात आली आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे ऐतिहासीक शिल्प ग्रामस्थ पुन्हा उभं करणार आहेत. पण त्यासाठी त्यांनी हणुनमान मंदिराच्या बाहेर आणि गटारीच्या समोर त्याची जागा निश्चित केली आहे. त्यामुळं शिल्पाचे ऐतिहासीक मौल्य धोक्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.