मुंबई : टीपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्या कर्नाटक सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 'पांचजन्य' या मुखपत्र टीका करण्यात आलीय.
अल्पसंख्यांक समुदायाला खुश करण्यासाठी कर्नाटक सरकारनं हा निर्णय घेतल्याचं आरएसएसनं म्हटलंय. इतकंच नाही तर, टीपू सुलतान याचा उल्लेख 'दक्षिणेचा औरंगजेब' म्हणून या लेखात करण्यात आलाय. टीपू सुलताननं दक्षिणेत लाखो लोकांचं जबरदस्तीनं धर्मांतरण केलं होतं, असं आरएसएसनं म्हटलंय. तसंच त्यानं हजारोंच्या संख्येनं मंदिरं पाडली असाही दावा आरएसएसनं केलाय.
अधिक वाचा - तुम्हाला टीपू सुलतानबद्दल 8 या गोष्टी माहीत आहेत का?
एका संताच्या वक्तव्याला अधोरेखित करत या लेखात सरकारनं टीपूसारख्या वादग्रस्त व्यक्तींच्या जयंतीपासून दूर राहावं आणि मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि सर इस्माइलसारख्या मुस्लिम व्यक्तींची जयंती साजरी करावी, असा सल्लाही 'पांचजन्य'मध्ये सरकारला देण्यात आलाय. सर मिर्झा इस्माइल मैसूर (नंतर जयपूर आणि आता हैदराबाद) प्रांताचे दीवान होते.
अधिक वाचा - 'टीपू सुलतान हिंदू असते तर त्यांनाही छत्रपतींसारखा मान मिळाला असता'
टीपू जयंती साजरी करण्यामागे 'मुस्लिमांच्या मतांचं राजकारण' केवळ हाच उद्देश होता, असंही पांचजन्यमध्ये म्हटलं गेलंय. टीपू हा धर्मनिरपेक्ष नव्हता तर एक असहिष्णू आणि कोणत्याही प्रकारचा अंकुश नसलेला शासक असल्याचा दावा या हिंदू संघटनेनं केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.