नवी दिल्ली: ऐतिहासिक लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 68व्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला संबोधित करतील. मोदींचं हे भाषणही यावेळी ऐतिहासिक असणार आहे.
दरवर्षी पंतप्रधान भाषण वाचून दाखवण्याचा रिवाज पाळला जातो. पण यावेळी मोदी आपल्या भाषणाचे मुद्दे लिहून आणतील आणि स्वयंप्रेरणेनं भाषण करतील. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे अधिकारी आणि दुभाषे लगेच मोदींच्या भाषणाचं भाषांतर करून त्याचं स्क्रिप्ट तयार करतील.
सरकारची ध्येयधोरणं, आगामी काळातल्या योजना, तसंच भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भातले मुद्दे पंतप्रधानांच्या या भाषणात असणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.