www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
झी मीडिया कार्पोरेशन लॉन्च करणार आहे ‘आय एम इन- डीएनए ऑफ इंडिया’ हा सोशल प्लॅटफॉर्म... देशातल्या नागरिकांना सशक्त करण्यासाठी जनतेतलं अज्ञान दूर करण्यासाठी, त्यांना तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं सक्षम करत हा नवा उपक्रम सुरू करत आहे.
सामान्य माणसाच्या जीवनातल्या स्थानिक मुद्द्यांना खंबीरपणे पुढं आणणं, त्याचं रिपोर्टिंग करणं, सामान्य नागरिकांना जनतेच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याचा प्लॅटफॉर्म झी मीडिया कार्पोरेशन या उपक्रमाद्वारं मिळवून देणार आहे.
‘आय एम इन’ भारतातला पहिला बहुभाषिक, स्थानिक, अखिल भारतीय डिजिटल मंच आहे, ज्याद्वारे आगामी काही महिन्यांमध्ये देशभरात ५००हून अधिक जवळपासच्या परिसरांचा यात समावेश केला जाणार आहे. ज्या व्यक्तींना समाजासाठी काही करायचंय त्यांना इतरांसोबत काम करण्यासाठी या मंचद्वारे व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं जाईल.
उत्तम प्रशासनाची सुरुवात अशा लोकांपासून होते, जे ग्रामपंचायत, पालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा या प्रत्येक स्तरावरील आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याची धमक ठेवतात आणि त्याचं उत्तरही मागतात.
भारताच्या १.२ अब्ज जनतेतल्या लहानातल्या लहान श्रेणीतल्या व्यक्तींनाही जागरुक करण्याची ही प्रक्रिया असेल. ज्यामुळं देशातली परिस्थिती सुधारेल. संपूर्ण देशातले लोक एक चांगला प्रगतिशील भारत बनवण्यासाठी काही तरी करण्याची इच्छा ठेवतात. मात्र त्यांना त्यासाठी काय करावं हे समजत नाही, अशाच जनतेला मार्गदर्शन करण्याचं काम ‘आय एम इन...’करणार आहे.
याशिवाय “एकटं लढणं म्हणजे हरणं” ही ज्यांची मानसिकता झाली आहे. “मी एकटा काय करु शकतो? हे असंच चालणार” असं जे लोक विचार करतात. त्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांच्या आजुबाजुला काही लोकं आहेत जे देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं या मंचद्वारे अशा लोकांच्या विचारांमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
झी मीडिया कार्पोरेशनचे चेअरमन श्री. सुभाष चंद्रा म्हणाले, “माझा भारतावर विश्वास आहे, भारत एक उत्तम आणि प्रगतिशील देश बनण्यासाठी देशातल्या नागरिकांवर आणि त्यांच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. आपण भारताबद्दल नेहमी तक्रार करतो की माहित नाही काय करावं आणि कसं करावं. मात्र आपण नेहमी मोठ्या संकटाकडे बघतो. छोट्या-छोट्या समस्या सोडवल्या तर मोठ्या समस्या आपणहून सोडवल्या जातात. देशात बदल घडवून आणण्यासाठी खालच्या पातळीवरील जनतेला सक्षम बनवण्याचा आमचा उद्देश आहे. गांधीजी म्हणाले होते, की आपण जे समाजात पाहू इच्छितो, तो बदल आपण घडवावा. ‘आय एम इन- डीएनए ऑफ इंडिया’च्या लॉन्चिंगद्वारे आपण एक आशा बाळगू शकतो की, या भारत देशाला १.२ अब्ज नागरिकांच्या स्वप्नातला उत्तम आणि प्रगतिशील देश बनवू.”
या मंचच्या उपक्रमांतर्गत आजुबाजुच्या जवळपास २०० क्षेत्रांमधून स्वयंसेवकांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. आपल्याला फक्त एक ‘नागरिक डीएनए’ ही टेस्ट द्यावी लागेल, ज्यामुळं आपण एक स्वयंसेवक होऊ शकता हे सिद्ध होईल.
या उपक्रमाबाबत झी मीडिया कार्पोरेशनचे ग्रृप सीईओ डॉ. भास्कर दास म्हणाले, “आज भारतात आपण खूप ऊर्जा बघतो. देशासाठी काही करण्याची इच्छा, ऊर्जा अनेकांमध्ये दिसून येते. जर त्या उर्जेचा उपयोग केला गेला नाही, तर निराशा, आपण काही करु शकत नसल्याची भावना उत्पन्न होऊ शकते. त्यामुळं या नकारात्मक ऊर्जेचं सकारात्मक ऊर्जेत रुपांतर करणं गरजेचं आहे.”
`आय एम इन- डीएनए ऑफ इंडिया` एक असा पुढाकार आहे, की जो देशभरातल्या नागरिकांच्या इच्छाशक्तीत वाढ करेल. मुख्य म्हणजे ज्या नागरिकांना देशासाठी, समाजासाठी काही करायचंय त्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
अनेक स्थानिक नागरिकांचा समूह जर एकत्र आला तर देशाचा गुणात्मक दर्जा वाढवून परिवर्तन घडवून आणू शकतो, हे निश्चित.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.