'साहित्यिक मंचावर राजकारणी नको म्हणतात, मग त्यांनीही....', CM फडणवीस स्पष्टच बोलले 'तुम्हीही मर्यादा...'

साहित्यिकांनीही पार्टी लाईन्सवर कमेंट करणं योग्य नाही, त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.  

शिवराज यादव | Updated: Feb 24, 2025, 05:07 PM IST
'साहित्यिक मंचावर राजकारणी नको म्हणतात, मग त्यांनीही....', CM फडणवीस स्पष्टच बोलले 'तुम्हीही मर्यादा...'

साहित्यिकांना राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नये असं वाटत असतं किंवा मग त्यांची तशी विधानं असतात. मग त्यांनीही पार्टी लाईन्सवर कमेंट करणं योग्य नाही, त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा पाळल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं आहे. निलम गोऱ्हे यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "त्या पक्षात त्या होत्या. मी त्या पक्षात नव्हतो. त्या पक्षात काय चालायचं हे त्याच सांगू शकतात. मी त्यावर भाष्य करु शकत नाही".  

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारण्यातआलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, "राज्यात कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल त्याचं स्वागत करेन. विसंवाद नको, सुसंवाद असावा यासंदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सुसंवाद करावा". यावेळी त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख न करता टोला लगावला. "तुम्ही सर्वांनी मिळून 9 वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे शिकवलं तर राज्यातील सुसंवादाची परिस्थिती सुधारेल. जसं 50 टक्के ते दोषी आहेत, तसं 50 टक्के तुम्हीही दोषी आहात," असं ते उपहासात्मकपणे म्हणाले. 

माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांवर ते म्हणाले की, "आमच्याकडे कोणीही तक्रार केली तर आम्ही त्याची चौकशी करत असतो. पण तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं होत नाही. तपासाच्या अंती जे काही निघेल त्यानंतर मी त्यावर वक्तव्य करेन".

"माणिकरावर कोकाटे यांना पीएस, ओसएडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो हे माहिती नसेल. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि अंतिम निर्णय घेतला जातो. मी कॅबिनेटमध्ये तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण ज्यांची नावं फिक्सर, चुकीच्या कामात गुंतली आहेत त्यांना मान्यता देणार नाही हे स्पष्ट केलं होतं. 125 च्या आसपास नावं आली आहेत. 109 नावं क्लिअर केली आहेत. पण इतरांच्या नावे काहीतरी आरोप, चौकशी किंवा मंत्रालयात ज्यांच्याबद्दल फिक्सर अशी ओळख आहे. कोणीही नाराज झाले तरी मी त्यांना मान्यता देणार नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 

"राज्यमंत्री आशिष जैयस्वाल यांनी पुढाकार घेतला आहे. अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी अनियमितता शोधून काढल्या आहेत. पोरांना शिक्षण मिळत नसताना काहीजण पैसे लाटत आहेत. त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती त्यांनी दिली. 

ठाणे, कल्याण अतिक्रमण कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, "बिल्डरच कारस्थान करुन पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि कोणालातरी कोर्टात पाठवायचं असे धंदे करत आहेत. हे धंदे योग्य नाहीत. या संदर्भात एकनाथ शिंदेंशी बोलणं झालं आहे. त्यांनी तथ्य माझ्यासमोर मांडलं आहे. आम्ही कोर्टात बाजू मांडणार आहोत".