भारताकडून पराभूत होऊनही पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी? असं आहे समीकरण

Champions Trophy 2025 : स्पर्धेत एकूण दोन सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाचं स्पर्धेतील आव्हान अडचणीत आलं असलं तरी अजूनही सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा मावळलेल्या नाहीत. 

पुजा पवार | Updated: Feb 24, 2025, 04:23 PM IST
भारताकडून पराभूत होऊनही पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी? असं आहे समीकरण
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) ही स्पर्धा सध्या रंगात आली आहे. रविवारी स्पर्धेतील पाचवा सामना भारत - पाकिस्तान (India VS Pakistan) या संघांमध्ये पार पडला. ज्यात भारताकडून यजमान पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला. स्पर्धेत एकूण दोन सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाचं स्पर्धेतील आव्हान अडचणीत आलं असलं तरी अजूनही सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा मावळलेल्या नाहीत. पाकिस्तान या स्पर्धेत टिकणार की नाही हे आज न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (Newzealand VS Bangladesh) सामन्यानंतर स्पष्ट होईल. 

न्यूझीलंड संघाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 60 धावांनी विजय मिळवला होता. या मोठ्या विजयानंतर न्यूझीलंडचा रनरेट सुद्धा चांगला झाला. ग्रुप एमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. सध्या भारत दोन सामने जिंकून +0.647 च्या रन रेटने ग्रुपमध्ये प्रथम स्थानावर आहे. पण जर न्यूझीलंड आज बांगलादेश विरुद्ध जिंकला तर ते दोन सामन्यात दोन विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये प्रथम स्थान पटकावतील. तसेच त्यांचा नेट रन रेट हा +1.200 इतका होईल. 

हेही वाचा : भारत - पाक सामन्यात हार्दिक पंड्याने घातलं 70000000 रुपयांचा घड्याळ, पाकिस्तानी खेळाडू पाहताच बसले

 

बांगलादेशला भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे सध्या त्यांचा रन रेट -0.048 असा आहे. त्यामुळे दुसरा पराभव झाल्यास बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाहेर जाईलच पण सोबत पाकिस्तानचा सुद्धा स्पर्धेतून पत्ता कट होईल. सध्या दोन सामन्यात पराभूत झाल्यास पाकिस्तान सर्वात शेवटच्या पोझिशनवर पोहोचला आहे. त्यांचा रन रेट हा  -1.087 मध्ये आहे. जर सोमवारी न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा पराभव केला तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान जिवंत राहू शकतं. 

न्यूझीलंडची प्लेईंग 11:

मिशेल सेंटनर (कर्णधार), माइकल ब्रेसवेल, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, टॉम लैथम, डेरिल मिशेल, विल ओ’रूर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विलियमसन, विल यंग, ​​जैकब डफी

बांग्लादेशची प्लेईंग 11 :

नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), सौम्या सरकार, तंजीद, हसन, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, एमडी महमूद उल्लाह, जाकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेज हुसैन इमोन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, नाहिद राणा