BHEL Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भेल अंतर्गत नोकरी मिळालेल्या उमेदवारांना दरमहा 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला यामाध्यमातून चांगले पद आणि पगाराची नोकरी मिळवण्याची संधी आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये इंजिनीअर ट्रेनी (ET) आणि सुपरवायजर ट्रेनी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. BHEL च्या या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट bhel.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक आहेत.
भेलच्या या भरतीद्वारे एकूण 400 पदे भरली जाणार आहेत. जर तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल पुढील तपशील काळजीपूर्वक वाचा.BHEL अंतर्गत इंजिनीअर ट्रेनीच्या एकूण 150 जागा भरल्या जातील. यात मेकॅनिकलची 70 पदे, इलेक्ट्रिकलची 25 पदे, सिव्हिलची 25 पदे, इलेक्ट्रॉनिक्सची 20 पदे, केमिकलची 5 पदे, धातूशास्त्रची 5 पदे भरली जाणार आहेत. सुपरवायजर ट्रेनीची एकूण 250 पदे भरली जातील. ज्यामध्ये मेकॅनिकलची 140 पदे, इलेक्ट्रिकलची 55 पदे, सिव्हिलची 35 पदे, इलेक्ट्रॉनिकची 20 पदे भरली जाणार आहेत.
इंजिनीअर ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई./बी.टेक किंवा समकक्ष पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. पर्यवेक्षक प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
इंजिनीअर ट्रेनी आणि सुपरवायजर ट्रेनी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 27 वर्षांपर्यंत असावे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे,ओबीसी (एनसीएल) उमेदवारांना 3 वर्षे, पीडब्ल्यूबीडी (यूआर) उमेदवारांना 10 वर्षे, पीडब्ल्यूबीडी (ओबीसी-एनसीएल) उमेदवारांना 13 वर्षे आणिपीडब्ल्यूबीडी (एससी/एसटी) उमेदवारांना 15 वर्षे इतकी सवलत देण्यात आली आहे.
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 1 हजार 72 रुपये, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/माजी सैनिकांकडून 472 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे.
BHEL अंतर्गत निवड झालेल्या इंजिनीअर ट्रेनींना दरमहा 50 हजार ते 1 लाख 80 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तर सुपरवायजर ट्रेनी पदासाठी उमेदवारांना 32 हजार ते 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
28 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्जात काही त्रुटी असल्यास आणि दिलेल्या मुदतीनंतर अर्ज केल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.