Joshi-Abhyankar Serial Murders: विद्येचे माहेरघर म्हणून ओखळलं जाणारं पुणे हे शहर 1976 साली घडलेल्या या घटनेने फार भयभयीत होऊन गेलं होतं. संध्याकाळी सातनंतर घराबाहेर पडण्याचीही पुणेकरांना भीती वाटू लागली. शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या या शहराच्या प्रतिमेला जोशी-अभ्यंकर या हत्याकांडाने प्रथमच तडा गेला. या हत्याकांडाने पुणेकर हादरून गेले होते. आजही पुण्यातील काही भागांत फिरताना जुन्या पुणेकरांना या हत्याकांडाच्या कटू आठवणी आठवत असतील. नेमकं काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया.
जोशी-अभ्यंकर हत्यांकाडाला 31 ऑक्टोबर 1976 साली सुरुवात झाली. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह ह्या चार तरुणांनी हे हत्याकांड घडवून आणले. यातील मुनव्वर शाह याने 'यस आय आम गिल्टी' नावाचे आत्मचरित्र लिहलं होतं. त्यात त्याने त्याच्या गुन्ह्यांबद्दल आणि हत्याकांडाचा सूत्रधार जक्कलच्या विकृत स्वभावाबद्दल लिहून ठेवलं होतं. कोर्टाने या चारही जणांना 27 नोव्हेंबर 1983 रोजी फाशी देण्यात आली होती.
पुण्यातील जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला 'माफीचा साक्षीदार' असा सिनेमादेखील प्रदर्शित झाला होता. महाविद्यालयात शिकणाऱ्या चार तरुणांनी अत्यंत थंड डोक्याने तब्बल 10 जणांचे खून केले. फक्त चैनी आणि पैशांसाठी या तरुणींनी लूट आणि खून केले. चोरी केल्यानंतर पकडले जाऊ नये यासाठी ते घरातील व्यक्तींची हत्या करायचे. अशाच दोन कुटुंबांची त्यांनी हत्या केली. तर, दोन मित्रांचाही खून केला.
जक्कल गँग असं या चौकडीला ओळखलं जायचं. या जक्कल गँगने सर्वात पहिले त्यांच्याच एका मित्राचा खून केला. पहिला खून पचवता आल्यानंतर त्यांची भीती चेपली आणि त्यांनी एकामागोमाग एक अशा खूनाची मालिकाच सुरू केली. सिरीअल किलर जक्कल गँगची दहशत पुण्यात पसरली ती अभ्यंकर यांच्या घरातील दरोडा आणि हत्या प्रकरणानंतर. जक्कल गँगने अभ्यंकरांच्या बंगल्यात प्रवेश केल्यानंतर घरातील तिजोरी फोडली इतकंच नव्हे तर घरातील सर्व पाच व्यक्तींचे खून केले. त्यानंतर थंड डोक्याने घरातील जेवणाच्या टेबलावर ठाण मांडून स्वयंपाकघरातील अन्न जेवले. इतकंच नव्हे तर त्यांची हत्या करण्यापूर्वी अभ्यंकरांच्या नातीचे कपडे काढण्यात आले. जेणेकरुन तिला पळून जाता येऊ नये.
त्यानंतर दुसरा सावज त्यांनी हेरला तो जोशी बंगला. घरात पन्नाशीचे दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा इतकेच सदस्य. घरात पाळत ठेवून पती-पत्नीच घरात असताना चौघे घरात शिरले आणि पती-पत्नीना चाकूचा धाक दाखवत हात पाय बांधले आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. घरातील सर्व ऐवज लूटून पळून जात असताना मुलगा आला. तेव्हा त्यालाही अशाच प्रकारे संपवले. अभ्यंकर हत्याकांडाप्रमाणेच जोशींच्या मुलाचेही कपडे काढले त्यानंतर त्याचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आली. घरातील सर्व पुरावे नष्ट केले. उग्र वासाचे अत्तर फवारले जेणेकरुन पोलिसांच्या श्वान पथकाला माग काढणं अशक्य होईल.
जोशी-अभ्यंकर यांच्या हत्याकांडाने आणि खून करण्याची पद्धत एकच असल्याने पोलिस सीरिअल किलरच्या मागावर होतं. मात्र, या चौघांची एक चूक आणि ते पकडले गेले. जक्कलने त्याच्याच गोखले नावाच्या मित्राच्या भावला संपवले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना एका मद्यपीने या चौघांनाही बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. मात्र एका दारूड्यावर विश्नास न ठेवता पोलिसांनी त्यालाच कोठडीत डांबले.
तर, त्याचदिवशी गोखलेच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. कुटंबीय बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला पोलिसांत गेले असतानाच तिथे जक्कल गँगदेखील पोहोचली होती. तसंच, मित्राला शोधायला इतका वेळ का लागतो यावरुन पोलिसांशी हुज्जत घालत होता. जेणेकरुन पोलिसांचा त्याच्यावर संशय येणार नाही. मात्र, तुरुंगात असलेल्या त्या मद्यपीने जक्कल गँगला ओळखले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि चारही जणांना ताब्यात घेतलं. जक्कल गँगसोबत आणखी एक गडी होता. मात्र तो प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी नव्हता मात्र त्याला या सगळ्याची कल्पना होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सगळं खरं खरं सांगून टाकलं आणि जक्कल गँग पकडली गेली. पोलिसांनी त्याला माफीचा साक्षीदार केले.
15 मे 1978 साली पहिला खून केल्यानंतर तब्बल अडीच वर्षांनी जक्कल, चांडक, जगताप, सुतार आणि मुनव्वर अशा पाच जणांवर 10 खून केल्याचे आरोपपत्र दाखल झाले. त्यानंतर 27 नोव्हेंबर 1983 साली येरवडा कारागृहात फासावर लटकवण्यात आले