Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, 9 ग्रह हे मानवी जीवनावर परिणाम करतात असं मानलं जातं. प्रत्येक ग्रहाची आपली अशी वैशिष्ट्यं आहेत. यातील शनि हा ग्रह न्याय देवता किंवा कर्मदाता म्हणून ओळखला जातो. जाचकाला शनिदेवाची भीती वाटते. शनिची वाकडी नजर एखाद्यावर पडली तर त्याच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होतात. शनि ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करायला सर्वाधिक वेळ लागणार आहे. शनिदेव एका राशीत साधारण अडीच वर्ष राहतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, येत्या 28 फेब्रुवारी 2025 ला न्यायदेवता शनि त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीत अस्त होणार आहे. अशात कुंभ राशीत शनीचे अस्त काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Shani Asta 2025 Shani Dev will brighten the fortune of these 3 zodiac signs from February 28 Bank balance will increase along with immense wealth)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि मेष राशीच्या अकराव्या घरात अस्त होणार आहे. अशा स्थितीत, या राशीच्या लोकांसाठी शनीचा अस्त शुभ सिद्ध होणार आहे. शनीच्या अस्तामुळे मेष राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रचंड यश प्राप्त होणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम आता मार्गी लागणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे संकेत आहेत. बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नफा प्राप्त होणार आहे. या काळात पैसे येण्याची चांगली संधी चालून येणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि कर्क राशीच्या आठव्या घरात अस्त करणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची अस्त खूप शुभ ठरणार आहे. यावेळी, त्यांना त्यांच्या कारकिर्दीत प्रगती करण्यासाठी उत्तम संधी प्राप्ता होणार आहे. या काळात अचानक आर्थिक लाभ होणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणताही मुद्दा तुमच्या बाजूने लागणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद असणार आहे. नात्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ नवीन संधी प्राप्त होणार असून भविष्यात याचा फायदा होणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि धनु राशीच्या तिसऱ्या घरात अस्त होईल. त्यामुळे, धनु राशीच्या लोकांना शनीच्या अस्तामुळे अनेक मोठे फायदे प्राप्त होणार आहे. या काळात करिअरमध्ये प्रगती होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला राहील आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार आहे. कुटुंबात आनंद आणि शांती नांदणार आहे. भाऊ-बहिणींसोबतचे नाते अधिक दृढ होणार आहे. या काळात, तुम्हाला लांबचा प्रवास घडणार आहे. जो भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)