Salman Khan, Amitabh Bachchan Baghban Movie : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक चित्रपट केले. त्यातील काही चित्रपट हे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यापैकी एक म्हणजे बागबान (Baghban). या चित्रपटात महत्त्वाची भूमिका ही अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांची आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का की एवढे दिग्गज कलाकार असूनही हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी कोणी घेत नव्हतं. अर्थातच या चित्रपटाला कोणताही डिस्ट्रिब्यूटर घेत नव्हता. चित्रपटात सलमान खानची छोटी भूमिका होती पण ती चित्रपटाच्या भविष्यासाठी महत्त्वाची ठरली. रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा हा कल्ट झाला. आता रवी चोप्रा यांची पत्नी रेणू चोप्रा यांनी सांगितलं की 'बागबान' चित्रपटाला आधी कोणी डिस्ट्रिब्यूटर मिळत नव्हता. मग निर्माते सलमानकडे गेले आणि त्यानं लगेच होकार दिला.
रेणु चोप्रा यांनी ही मुलाखत 'पिंकव्हिला'ला दिली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की 'बागबान' हा चित्रपट तयार झाला होता. पण त्या चित्रपटात सलमान खान नव्हता. जेव्हा डिस्ट्रिब्यूटर्सला या चित्रपटाविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी या चित्रपटाला डिस्ट्रीब्यूट करण्यास नकार दिला. त्यानं निर्मात्यांनी चित्रपटात सलमान खानला कास्ट केलं आणि हा चित्रपट हिट ठरला.
याविषयी सविस्तर सांगत रेणु म्हणाल्या, ''बागबान' च्यावेळई आम्ही सलमानजवळ गेलो होतो. 'बागबान' पिक्चर रेडी होता. पण कोणी डिस्ट्रिब्यूटर हा चित्रपट घेण्यासाठी तयार नव्हता. सगळ्यांनी म्हटलं की खूप ओल्ड फॅशन चित्रपट आहे. त्यावेळी अमिताभ यांचे सगळेच चित्रपट हे फ्लॉप जात होते. तर त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं की कोणी हा चित्रपट घेणार नाही. त्यानंतर एका व्यक्तीनं सांगितलं की सलमानला घ्या. रवी, सलमानला ओळखत होते. पण असं नाही जसं तुम्ही ओळखतात. सलमान देखील रवीला एक चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखत होता. आम्ही सुद्धा सलमानला एक मोठा अभिनेता म्हणून ओळखत होतो. मग सलमाननं रवीला सांगितलं की माझ्या घरी ये.'
पुढे रवीच्या घरी काय झालं याविषयी सांगत रेणू म्हणाल्या, 'रवी सलमानच्या घरी गेले. त्यानं सांगितलं की दोन रुम असलेलं त्याचं घर आहे. आजवर मी सलमानसारखं इतका सिंपल माणूस पाहिला नाही. तिथे सलमानची जीम होती. रवी तिथे त्याची प्रतीक्षा करत होती. जीममधून एक भाऊ निघाला त्यानं शर्ट घातलं नव्हतं. दुसरा भाऊ निघाला त्याचे मसल्स होते. तर रवी म्हणाले मला असं वाटलं की मी जरा जास्तच कपडे परिधान करून आलोय. त्यानंतर सलमान शॉर्ट्सवर आला.'
सलमानची काय प्रतिक्रिया होती हे सांगत रेणू म्हणाल्या, 'सलमाननं त्याची भूमिका ऐकली आणि त्याला ती प्रचंड आवडली. त्यानं म्हटलं की मी देखील असाच आहे. मी पण माझ्या आई-वडिलांना देव समजतो आणि त्यांची पूजा करतो. त्यामुळे मी हा चित्रपट करणार. त्यानं त्याशिवाय दुसरं काही सांगितलं नाही किंवा विचारलं नाही. त्यासोबत त्यानं हे देखील विचारलं नाही की किती मानधन मिळेल. त्यानं फक्त विचारलं की कुठे यायचं आणि कसं शूट करणार आहोत.'
हेही वाचा : 'बाबा निराला' च्या भूमिकेला होकार देण्याआधी बॉबी देओलनं केली पत्नीशी चर्चा; तान्यानं दिलं होतं 'हे' उत्तर
रेणु यांनी सांगितलं की 'बागबान' बनवण्याआधी अनेकांनी नकार दिला होता. त्याची पटकथा ही रवी यांचे वडील बीआर चोप्रा यांनी देखील चित्रपट करण्यास नकार दिला होता. बीआर चोप्रानं चित्रपट बनवण्यासाठी जवळपास 20 वर्षांपूर्वी ही पटकथा लिहिली होती. 10 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली होती.