सोन्याच्या वाढत्या किमतीमागचं कारण काय? जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली आणि काय आहेत आजचे दर जाणून घ्या.

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 24, 2025, 11:24 AM IST
सोन्याच्या वाढत्या किमतीमागचं कारण काय? जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर
Gold Rate Today in the market silver price today in mcx in india

Gold Price Today: देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग आठव्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. चांदीच्या दरात किंचितशी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. एमसीएक्सवर सोनं 86,000 रुपयांच्या वर व्यवहार करत आहेत. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर $2,950 प्रति औंसच्या वर पोहोचली आहे. सोन्याचे हे दर डोनाल्ड ट्रंपचे टॅरिफ वॉर आणि सेंट्रल बँके सातत्याने खरेदी होत असल्याने वाढल्याचे पाहायला मिळतंय. तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि चीनमधील व्यापारातील वाढते तणाव आणि फेडरल रिझर्व्ह बँकेच्या दरांबाबत अनिश्चितता असताना गुंतवणुक म्हणून सोन्याचा पर्यायाचा विचार करत आहेत. याच कारणामुळं सोनं सातत्याने मजबूत होताना दिसत आहे. 

चांदीच्या दरात मात्र किंचितशी घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय. एमसीएक्सवर चांदी 96,000 च्या जवळपास व्यवहार करताना दिसत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात $33 प्रति औंसवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. मात्र घरगुती बाजारात चांदीचे दर घसरले आहेत. 

सोन्याच्या दरात आत्तापर्यंत 11 टक्क्यांची अधिक तेजी आली आहे. मौल्यवान धातुचा विचार गुंतवणुक म्हणून अधिक करण्यात येत आहे. सोन्याच्या दरात आज 100 रुपयांची वाढ झाली असून 22 कॅरेट सोन्याचे दर  80,550 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर 100 रुपयांवर पोहोचले असून 87,870 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याचे दर 90 रुपयांनी वाढले असून 65,910 रुपयांवर प्रतितोळा सोनं पोहोचलं आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,550 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,870 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,910 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,055 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,787 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,591 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,440 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   70,296 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    65,910 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 80,550 रुपये
24 कॅरेट- 87,870 रुपये
18 कॅरेट- 65,910 रुपये