Champions Trophy 2025: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपली दमदार खेळी दाखवून रविवारी सलग दुसरा सामना जिंकला. टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावून टीम इंडियाला विजयापर्यंत नेले. यासह टीम इंडियाने स्पर्धेतील 2 सामन्यांतून 2 सामने जिंकले असून उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, तर पाकिस्तान बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. दुबईमध्ये रंगलेल्या या एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यावर भारताने त्याचे स्थान उपांत्य फेरीत निश्चित झाले असे वाटतं होते पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टीम इंडिया अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकते.
आता आपण उपांत्य फेरीचे समीकरण जाणून घेऊयात. सलग 2 विजयानंतर टीम इंडिया सहज बाद फेरीत पोहोचेल हे अगदी निश्चित होते. पण तरी या गटात म्हणजेच अ गटात अजून 3 सामने बाकी आहेत. पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश असा सोमवार 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशने हा सामना जिंकल्यास त्याचे 2 गुण होतील.
हे वाचा: IND vs PAK: हार्दिक पांड्याला मिळाले नवी 'लेडी लव्ह'? बाबर आझमच्या विकेटवर दिली 'ही' खास प्रतिक्रिया
हे वाचा: IND vs PAK: रोहितच्या बायकोसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? सोशल मीडियावर चर्चा
आज (24 फेब्रुवारी) बांगलादेशची न्यूझीलंड विरुद्ध सामना आहे. या सामन्यात बांगलादेशचा संघ हारला तर टीम इंडिया उपांत्य फेरीसाठी नक्कीच पात्र ठरेल. आता कसे ते जाणून घेऊयात. वास्तविक, न्यूझीलंडच्या विजयाने त्यांचेही 4 गुण होतील. त्याचबरोबर पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशचे खातेही दोन सामन्यांनंतर उघडणार नाही. अशा परिस्थितीत या दोन संघांनी आपले शेवटचे सामने जिंकले तरी त्यांचे भारत आणि न्यूझीलंडसारखे समान गुण होणार नाहीत, ज्यामुळे भारत आणि न्यूझीलंड संघ गट-अ मधून टॉप-2 मध्ये असल्याने उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्याचवेळी बांगलादेश-पाकिस्तानचा प्रवास इथेच संपणार आहे.
हे वाचा: कोण असणार रुपेरी पडद्यावरचा सौरभ गांगुली? बायोपिकसाठी 'या' बॉलीवूड हिरोचे नाव निश्चित
अशाप्रकारे अ गटातील तीन संघ प्रत्येकी 4 गुणांसह बरोबरीत राहतील. अशा परिस्थितीत नेट रन रेटच्या आधारे निर्णय घेतला जाईल. सध्या टीम इंडियाचा नेट रन रेट 0.647 आहे, तर न्यूझीलंडचा 1.200 आहे. जर टीम इंडिया शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडकडून मोठ्या फरकाने पराभूत झाली तर भारतीय संघाचा धावगती कमी होईल. तर याच्या उलट न्यूझीलंडची स्थिती अधिक चांगली होऊ शकते. अशा परिस्थितीत टीम इंडिया नेट रन रेटच्या शर्यतीत मागे पडली तर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. मात्र, प्रकरण इथपर्यंत पोहोचणार नाही, पुढच्या सामन्यातच न्यूझीलंडने बांगलादेशचा पराभव केला तर भारत आणि न्यूझीलंड थेट उपांत्य फेरीत पोहोचतील.