Holi Special Train News: होळीसाठी गावी जाण्याचा बेत करताय तर मध्य रेल्वेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. होळीसाठी मुंबईतून राज्याच्या इतर भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने २८ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे-नागपूर दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. ९ मार्च ते २१ मार्च या कालावधीत या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना कन्फर्फ तिकिट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रवाशांना आता रेल्वेच्या वेटिंग लिस्टमध्ये ताटकळत राहावे लागणार नाही.
>> सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी : २ दिवस (रविवार आणि मंगळवार) ८ सेवा, डबे - 24
कधी? : सीएसएमटीवरून
नागपूरसाठी दिनांक 9, 11, 16 आणि 18 रोजी रात्री 12.20 वाजता सुटेल आणि नागपूरवरून सीएसएमटीसाठी 9, 11, 16 आणि 18 मार्च रोजी रात्री 8 वाजता सुटेल आणि 1.30 वाजता पोहोचेल.
थांबे दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
>> सीएसएमटी मडगाव सीएसएमटी साप्ताहिक विशेष (फक्त गुरुवार) - 4 सेवा, डबे-24
कधी? : सीएसएमटीवरून
मडगावसाठी 6 आणि 13 मार्च रोजी रात्री 12.20 वाजता सुटेल आणि मडगाववरून सीएसएमटीसाठी 6 आणि 13 मार्च रोजी दुपारी 2.15 वाजता सुटेल.
>> लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) मडगाव एलटीटी साप्ताहिक विशेष (फक्त गुरुवार) - 4 फेऱ्या, डबे-14
कधी? : एलटीटीवरून मडगावसाठी 13 आणि 20 मार्च रोजी रात्री 9:15 वाजता सुटेल आणि मडगाववरून एलटीटीसाठी 14 आणि 21 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजता सुटेल.
>> एलटीटी हुजूर साहिब नांदेड-एलटीटी साप्ताहिक विशेष : (फक्त बुधवार) - 4 सेवा, डबे - 21
कधी? : एलटीटीवरून नांदेडसाठी 12 आणि 19 मार्च रोजी मध्यरात्री 12.55 वाजता सुटेल आणि नांदेडवरून एलटीटीसाठी 12 आणि 19 रोजी रात्री 9.30 वाजता सुटेल.
>> पुणे -नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (मंगळवार आणि बुधवार) - 4 सेवा, डबे -20
कधी? : पुण्यावरून नागपूरसाठी 11 आणि 18 मार्च रोजी दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि नागपूरवरून पुण्यासाठी 12 आणि 19 मार्च रोजी सकाळी 8 वाजता सुटेल.
>> पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष : (बुधवार आणि गुरुवार) 4 सेवा, डबे-17
कधी? : पुण्यावरून नागपूरसाठी 12 आणि 19, मार्च रोजी दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि नागपूरवरून पुण्यासाठी 13 आणि 20 रोजी सकाळी 8 वाजता सुटेल.