Video: विराटने विजयी चौकार लगावत शतक झळावल्यानंतर पाकिस्तानी तरुणींनी काय केलं पाहाच

Pakistan Fans Celebration Virat Kohli Century: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये विराट कोहलीने त्याचं चौथं शतक झळावलं. या सामन्यानंतर पाकिस्तानमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 24, 2025, 07:01 AM IST
Video: विराटने विजयी चौकार लगावत शतक झळावल्यानंतर पाकिस्तानी तरुणींनी काय केलं पाहाच
भारताच्या विजयानंतरचा व्हिडीओ व्हायरल

Pakistan Fans Celebration Virat Kohli Century: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला. भारतीय संघाने 6 विकेट्स आणि 45 चेंडू राखून पाकिस्तानवर मात केली. भारताच्या इनिंगमध्ये स्टार फलंदाज विराट कोहलीने अगदी विजय फटका लगावत आपलं शतकही पूर्ण केलं. भारताच्या या विजयासहीत भारत पुढील फेरीसाठी पात्र झाल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर भारतात ठिकठिकाणी जंगी सेलीब्रेशन झालं. विशेष म्हणजे भारताच्या विजयानंतर पाकिस्तानमधील काही चाहत्यांनी सेलीब्रेशन केल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानला विजय मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनीही विराट कोहलीचं शतक पूर्ण व्हावं यासाठी देव पाण्यात ठेवले होते. सामन्यातील शेवटच्या बॉलनंतर पाकिस्तानी चाहत्यांनी पाकिस्तानमध्येच केलेलं सेलीब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे.

विराटने एका बाजूने लढवला किल्ला

भारतीय संघासमोर 242 धावांचं लक्ष्य होतं. भारतीय संघाचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र पाचव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीने संयमी सुरुवात केली. भारताचा स्कोअर 100 वर असताना गिलही बाद झाला. गिलनंतर मधल्या फळीतील श्रेयस अय्यर मैदानात आला. त्यानेही उत्तम फटकेबाजी केली. 67 चेंडूंमध्ये त्याने 56 धावा केल्या. पाच चौकार आणि 1 षटकार श्रेयसने लगावला. भारताची धावसंख्या 214 वर असताना श्रेयस अय्यर 39 व्या ओव्हरला बाद झाला.  त्यानंतर स्कोअरकार्डमध्ये अवघ्या 9 धावांची भर घालून हार्दिक पंड्याही तंबूत परतला. एकीकडे भारतीय फलंदाज बाद होत असतानाच दुसरीकडे विराट कोहली किल्ला लढवत राहिला.

पाकिस्तानमध्ये विराटच्या शतकाचं सेलिब्रेशन

सामन्याच्या शेवटी भारताला विजयासाठी 2 धावा हव्या होत्या. 96 धावांवर फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीला मात्र शतकासाठी 4 धावांची गरज होती. विराटने ही संधी साधत चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारतीय चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र विराट कोहलीचं शतक झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनाही पाकिस्तानमध्ये जल्लोष केला. पाकिस्तानी चाहत्यांनीही 'विराट... विराट...' अशी घोषणाबाजी केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RVCJ Media (@rvcjinsta)

विराटचं विक्रमी शतक

विराटचं हे अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 82 वं शतक आहे. हे विराटसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वं शतक ठरलं. तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळताना विराटने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेलं हे 44 वं शतक ठरलं आहे. धावांचा पाठलाग करताना विराटचं हे 28 वं शतक ठरलं. पाकिस्तानाविरुद्ध विराटने झळकावलेलं हे चौथं शतक ठरलं. विराटने चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि दुबईच्या मैदानावर झळकावलेलं पहिलं शतक ठरलं.