IND vs PAK Memes: भारत जिंकला, पाकिस्तान हरला अन् IIT बाबा झाला ट्रोल, कारण...; मीम्सचा पाऊस

Champions Trophy 2025, IIT Baba: महाकुंभानंतर प्रकाशझोतात आलेले आयआयटी बाबा अभय सिंह यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयानंतर ट्रोल केलं जात आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 24, 2025, 10:17 AM IST
IND vs PAK Memes: भारत जिंकला, पाकिस्तान हरला अन् IIT बाबा झाला ट्रोल, कारण...; मीम्सचा पाऊस
Photo Credit: X

India vs Pakistan Match Memes: महाकुंभात अनेक वेगवेगळी लोक चर्चेत आली. त्यात सुरुवातीपासूनच एक बाबा चर्चेत आला. ते म्हणजे आयआयटी बाबा म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेला अभय सिंग. आयआयटी बाबा हे प्रसिद्ध झाल्यापासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. दरम्यान  भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या आधी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्यानुसार आयआयटी बाबाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे भाकीत केले होते. त्याच्या भाकितांनुसार पाकिस्तानविरुद्ध भारत हरेल असा निकाल त्यांनी दिला होता. याशिवाय तो म्हणाला होता की विराट कोहली आणि इतरांनी मेहनत केली तरी जिंकता येणार नाही.

आयआयटी बाबांना सोशल मीडियावर ट्रोल 

आयआयटी बाबाचं भाकीत खोटं ठरलं आणि भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या निकलानंतर पाकिस्तानला सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागले आहे. पाकिस्तानसोबतच आयआयटी बाबा अभय सिंह यालाही खूप ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर अनेक मीम बनवले जात आहेत. चला सोशल मीडियावर व्हायरल झालेले मिम्स बघुयात... 

हे ही वाचा: पाकिस्तानविरुद्ध भारत हारणार? IND vs PAK सामन्याबद्दल IIT बाबांचं भाकित ऐकून चाहत्यांमध्ये संताप

 

 

 

हे ही वाचा: IND vs PAK: हार्दिक पांड्याला मिळाले नवी 'लेडी लव्ह'? बाबर आझमच्या विकेटवर दिली 'ही' खास प्रतिक्रिया

 

 

 

भारताने मिळवला दमदार विजय 

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुसरा विजय मिळवला आहे. दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी महामुकाबला झाला. पाकिस्तानने आधीफलंदाजी करत 241 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने ४५ चेंडू बाकी असताना ६ विकेट्स राखून सामना जिंकला. भारतीय संघाकडून विराट कोहलीने शतक झळकावत विजय मिळवून दिला. शतकी खेळी केल्यानंतरही तो नाबाद राहिला. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला होता. आता संघाचा सामना २ मार्चला न्यूझीलंडशी होणार आहे.