Champions Trophy 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy 2025) पाचवा सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला असून स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकून सेमी फायनलमधील स्थान जवळपास निश्चित केलंय. तर यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद सांभाळणारा पाकिस्तान संघ स्पर्धेतून जवळपास बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाल्यावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरचे (Shoaib Akhtar) दोन व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. यात शोएबने पाकिस्तानच्या मॅनेजमेंटवर निशाणा साधलाय.
पाकिस्तानचा भारताकडून दारुण पराभव झाल्यावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने एक व्हिडीओ शेअर करत आपल्या पाकिस्तानी मॅनेजमेंटला सुनावलं. शोएब म्हणाला की, 'तुम्ही पाच गोलंदाजांना निवडू शकत नाही. मला दुःख आहे की त्यांना माहितीच नाही की काय करायचे. त्यांच्याकडे कोणते स्किल सेट सुद्धा नाहीत. त्यांना रोहित आणि कोहलीकडून शिकण्याची गरज आहे. मला माहित होतं या सामन्यात काय होणार आहे. जग 6 गोलंदाजांसोबत खेळत आहे. पोरांना काय सांगणार जसं मॅनेजमेंट तशी पोरं. त्यांना माहितीच नाही की त्यांना नक्की काय करायचंय. फक्त गेले पण त्यांना माहीतच नव्हतं की त्यांना काय करायचंय'.
विराटबाबत बोलताना पाकिस्तानी गोलंदाज म्हणाला की, 'जर कोणी कोहलीला सांगितले की तुमचा सामना हा पाकिस्तानच्या सोबत आहे तर तो पूर्ण तयारीशी उतरतो. आणि त्याने आज तेच केले. तो पूर्ण तयारी करून आला होता. कोहली वनडेचा चेस मास्टर आहे, तो एक अप्रतिम क्रिकेटर आहे मला माहित नाही की तो पुढे 100 शतक करेल की नाही पण तो एक महान फलंदाज आहे. मला तो खूप आवडतो. तो नेहमी पाकिस्तान विरुद्ध चांगली फलंदाजी करतो. माझी इच्छा आहे की त्याने 100 शतक पूर्ण करावी. तो आधुनिक क्रिकेटचा किंग आहे'.
हेही वाचा : भारत - पाक सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, रिझवान आणि हर्षित राणामध्ये मैदानात धक्काबुक्की, Video Viral
Just ran into an exceptional talent Abhishek Sharma here in Dubai. He do wonders in years to come. pic.twitter.com/8u6RNMZooS
— Shoaib Akhtar (shoaib100mph) February 22, 2025
शोएब अख्तरने काही दिवसांपूर्वी दुबईत भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्माची भेट घेतली. अभिषेकने टी 20 मध्ये लागोपाठ दोन सामन्यात शतकं केली. यावेळी तो अभिषेक शर्माबाबत बोलताना म्हणाला की, 'मला आनंद आहे की मी माजी क्रिकेटर आहे आणि या युगात जन्मलो नाही. कारण हा तरुण मुलगा आहे. त्याला शतक मिळाले आणि ते आश्चर्यकारक होते. मी त्याला सल्ला देईन की त्याने आपली शक्ती सोडू नये आणि त्याच्यापेक्षा चांगल्या लोकांशी मैत्री करावी. त्याला पुढे उदंड आयुष्य मिळाले आहे'.