Fight Against Obesity: पंतप्रधान नरेंद्र मोदींची लठ्ठपणा विरोधात मोहिम; 'या' 10 व्यक्तींना दिलं चॅलेंज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये लठ्ठपणावर चिंता व्यक्त केली. एवढंच नव्हे तर त्यांनी खाद्यतेलाचा वापर 10% कमी करण्याच चॅलेंज देखील दिलं आहे. यामध्ये त्यांनी नामांकित 10 व्यक्तींना हे चॅलेंज दिलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 24, 2025, 04:27 PM IST
Fight Against Obesity: पंतप्रधान नरेंद्र मोदींची लठ्ठपणा विरोधात मोहिम; 'या' 10 व्यक्तींना दिलं चॅलेंज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात देशातील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, खाद्यतेलाचे प्रमाण 10% कमी करण्यासारख्या छोट्या प्रयत्नांनी हे आव्हान हाताळता येते. पंतप्रधान म्हणाले की, ते यासाठी एक आव्हान सुरू करतील. यामध्ये 10 लोकांना आव्हान देतील की, ते त्यांच्या जेवणात तेल 10% कमी करू शकतात का? सोमवारी पंतप्रधान मोदींनी यासाठी 10 जणांना आव्हान दिले. ज्यात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचा समावेश आहे.

सोशल मीडियावर दिली माहिती 

रविवारी झालेल्या 'मन की बात' मध्ये सांगितल्याप्रमाणे, मी लठ्ठपणाविरुद्धच्या लढाईला बळकटी देण्यासाठी आणि अन्नात खाद्यतेलाचा वापर कमी करण्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या 10 जणांना नामांकित करू इच्छितो. तसेच मी त्यांना प्रत्येकी 10 जणांना नामांकित करण्याचे आवाहन करतो जेणेकरून आमची चळवळ मोठी होईल," असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट केले.

'या' 10 लोकांना दिलं चॅलेंज

  • आनंद महिंद्रा
  • दिनेश लाल यादव निरहुआ
  • मनु भाकर
  • मीराबाई चानू
  • मोहनलाल
  • नंदन नीलेकणी
  • उमर अबदुल्ला
  • आर माधवन
  • श्रेया घोषाल
  • सुधा मूर्ति

'मन की बात' मध्ये मांडला मुद्दा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये सांगितलं की, एका अभ्यासानुसार प्रत्येक 8 व्यक्तींपैकी एक व्यक्ती लठ्ठपण्याच्या समस्याने हैराण आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. ही समस्या त्यांच्यासाठी चार पटीने वाढली आहे. WHO चा डेटा सांगतो की, 2022 मध्ये जगभरातील सुमारे 25 कोटी लोक जास्त वजनाचे होते. पंतप्रधान म्हणाले, 'आपण एकत्रितपणे छोट्या प्रयत्नांनी या आव्हानाचा सामना करू शकतो. उदाहरणार्थ, मी सुचवलेली एक पद्धत म्हणजे स्वयंपाकाचे तेल 10 टक्क्यांनी कमी करणे.

काय आहे मोदींच चॅलेंज? 

पंतप्रधान म्हणाले, “आज, मन की बातच्या या भागानंतर, मी 10 लोकांना विनंती आणि आव्हान देईन की ते त्यांच्या जेवणातील तेलाचे प्रमाण 10% कमी करू शकतात का? मी त्यांना 10 नवीन लोकांनाही हेच आव्हान देण्याची विनंती करेन. मला विश्वास आहे की, यामुळे लठ्ठपणाशी लढण्यास खूप मदत होईल.' भारताला त्याच्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी 57% आयात करावे लागते.