Mahabharat Interesting Facts: पांडव आणि कौरवांमधील युद्धाबद्दल महाभारतात सांगण्यात आलंय. तुम्हाला माहितीये की द्रौपदीचं लग्न पांडवांशी झालं होतं. द्रौपदीबद्दल हिंदू धर्मात अनेक कथा सांगितल्या जातात. महाभारत काळातील अशा अनेक गोष्टी आहे, ज्या लोकांना माहिती नाहीत. त्यातील एक गोष्ट असं आहे की, राजा द्रुपदने आपली मुलगी द्रौपदीचं लग्न जेव्हा पांडवांशी केलं, तेव्हा पांडवांना राजाने किती हुंडा दिला होता. याबद्दलही अनेकांना माहिती नाहीय. पण महाभारतातील आदि पर्वाच्या विदुरगमन राज्यलंभ पर्वामध्ये याबद्दल सविस्तर लिहिण्यात आलंय. (Mahabharat Interesting Facts Draupadi father had given such a large dowry to the Pandavas)
महाभारत खंड 1, पृष्ठ क्रमांक 1428-29 मध्ये, राजा द्रुपदाने त्याच्या मुलीसह पांडवांना हुंडा म्हणून काय दिले होते याचा उल्लेख असल्याचा पाहिला मिळतो. महाभारतानुसार, पांडवांची पत्नी द्रौपदीच्या लग्नात तिचे वडील द्रुपद यांनी सोने, हत्ती, घोडे, गायी आणि दासी हुंडा म्हणून दिला होता. द्रौपदीच्या पाठवणीच्या वेळी राजा द्रुपदाने या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. पण पांडवांनी या सर्व गोष्टी हुंडा नाही तर भेट म्हणून स्वीकारल्या.
- महाभारतातील ग्रंथानुसार, द्रौपदीचे वडील राजा द्रुपद यांनी पांडवांना एक हजार हत्ती भेट म्हणून दिले होते. हे सर्व हत्ती रिकामे नव्हते. त्याच्या पाठीवर आणि गळ्यात सोन्याचे दागिने होते.
- राजा द्रुपदने पाच पांडवांना प्रत्येकी 4 घोड्यांसह 1 हजार रथ दिले होते. त्यावर सोन्याचे मणी आणि मोती होते. रथ दिसायला अत्यंत सुंदर असण्यासोबतच, त्यात 50 हजार घोडेही होते. हे सर्व घोडे सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेले होते.
- याशिवाय, द्रौपदीच्या लग्नात राजा द्रुपदाने पांडवांना हुंडा म्हणून 10 हजार दासी दिल्या होत्या. यासोबतच त्याने धनुर्विद्येत कुशल असलेले 10 हजार गुलामही भेट म्हणून दिले.
- राजा द्रुपदने प्रत्येक पांडवांना एक कोटी गायी भेट म्हणून दिल्या होत्या. पालखी आणि त्यांना वाहून नेण्यासाठी पाचशे वाहक देखील प्रदान करण्यात आले.
- राजा द्रौपद यांनी पांडवांना सोनेरी आसन, सोनेरी पलंग, सोनेरी भांडी दिली होती.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)