Astro Tips: कधी ना कधी आपल्याला रस्त्याने चालताना वाटेत पडलेली नोट किंवा नाणे दिसते. अशावेळी या पैशाचे काय करायचे? हेय उचलायचे की नाही? असे अनेक प्रश्न पडतात. अनेक लोक हे पैसे उचलून स्वतः न घेता गरज असलेल्या लोकांना देतात किंवा मंदिरात दान करतात. पण, मुळातच रस्त्यावर पडलेले पैसे उचलायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्यावर पडलेले पैसे मिळणे हे शुभ आहे की अशुभ याबद्दल जाणून घेऊयात याबद्दल...
> रस्त्यावर पडलेले पैसे, विशेषत: नाणी मिळणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, रस्त्यावर पडलेले नाणे सापडणे किंवा तुम्हाला दिसणे म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला आहे.
> याशिवाय असेही म्हटले जाते की यामुळे तुम्ही कोणतेही काम पूर्ण मेहनतीने केले तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. चीनमध्ये पैसा किंवा नाणी केवळ व्यवहाराचे साधन म्हणून पाहिली जात नाहीत तर त्यांना सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.
> वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी जात असाल आणि त्यावेळीच जर तुम्हाला रस्त्यात नाणे किंवा नोट पडलेली दिसली, तर ते तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल गे दर्शवते.
> कामावरून घरी परत येत असताना वाटेत तुम्हाला रस्त्यात पैसे पडलेले दिसले तर ते तुम्हाला लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत.
> जर तुम्हाला रस्त्यावर एखादे नाणे, नोटा पडलेली दिसली तर हे लक्षण आहे की तुम्ही लवकरच काही नवीन काम सुरू करू शकता. यावेळी तुम्हाला यश आणि पैसा दोन्ही देईल.
रस्त्यावर पडलेले पैसे मिळाले तर ते मंदिरात दान करा किंवा पर्समध्ये किंवा घरात कुठेतरी ठेवू शकता, परंतु वास्तूनुसार ते कधी खर्च करू नये.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)