अमेरिका आणि पाकिस्तान दरम्यान ताणलेले संबंध आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे. अमेरिकन सिनेटने पाकिस्तानला देण्यात येणारी ७०० दशलक्ष डॉलर्सचे सहाय्य गोठवलं आहे. पाक आणि अफगाण भागातील सुधारीत स्फोटक भूसुरुंगांचा मुकाबला करण्यासंबंधी पाकिस्तान आश्वासन देत नाही तोवर हे सहाय्य देण्यात येणार नाही.
पाकला सर्वाधिक अमेरिकन सहाय्य निधचा लाभधारक आहे. दरवर्षी नागरी तसंच लष्करी मदतीसाठी देण्यात येणाऱ्या काही शे कोटी रुपयांच्या प्रमाणात गोठवलेला निधीचे प्रमाण अत्यल्प आहे. पण पाकिस्तानने दहशतवादी गटांच्या विरोधात कारवाई न
केल्यास येत्या काही दिवसात अधिक सहाय्य निधीत कपात होऊ शकते. पाकने ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता हे अमेरिकन कमांडो कारवाई नंतर जगासमोर उघड झालं होतं. दहशतवादी गट सुधारीत स्फोटक भूसुरुंगांचा किंवा बॉम्बचा वापर अमेरिका आणि अफगाणीस्तानातील नाटो फौजां विरोधात प्रभावी हत्यार म्हणून करतात. त्यासाठी अमोनियम नायट्रेट या खताचा वापर हे गट करतात. पाकिस्तानातून हे खतं तस्करी करुन आणलं जातं. अमेरिकन सिनेटने गोठवलेला निधी संरक्षण विधेयकाशी संबंधित आहे. गेल्या दहा वर्षात अमेरिकेने पाकला २० बिलियन डॉलर एवढा मदत निधी दिला आहे.