नवी दिल्ली: नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानं हिमालयालाही हादरे बसलेत. या भूकंपामध्ये माउंट एव्हरेस्टचं टोकही हललं. भूकंपानंतर माउंट एव्हरेस्टवर एक बर्फाची लाट (एवलांच) आली.
२५ एप्रिलला एव्हरेस्टवर बर्फाची लाट आली त्यावेळी माउंट एव्हरेस्ट बेस कँपवर शूट केलं जात होतं. हा व्हिडिओ त्याच वेळी घेतला गेलाय जेव्हा भूकंप आला. या व्हिडिओमध्ये जर्मन गिर्यारोहक जोस्ट कोबुश यांच्या कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झालाय.
या व्हिडिओला आतापर्यंत यू-ट्यूबवर १५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प एवलांच असा झाला... जसा काही अणू स्फोट... एकीकडून नाही तर तीन ठिकाणांहून बर्फाची लाट आली. यात १८ जणांचा मृत्यू झालाय.
भूकंप झाला तेव्हा बेस कॅंपला १ हजार लोक उपस्थित होते. अचानक आलेल्या या एवलांचमध्ये गूगलचे अधिकारी डेनियल फ्रेडिनबर्ग यांचाही मृत्यू झालाय.
पाहा हा भयंकर व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.