www.24taas.com, झी मीडिया, लंडन
नवऱ्यानं प्रतारणा केली म्हणून आपली किडनी परत करण्याची मागणी लडंनमध्ये एका पत्नीनं केलीय.
आपल्या पतीचा जीव वाचविण्यासाठी काही वर्षांपूर्वी सामंथा या महिलेनं आपली किडनी आपल्या पतीला देऊ केली होती. तिचा पती अॅन्डी लाम्ब याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे त्याला डायलिसिसवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हा पतीच्या प्रेमापोटी सामंथानं त्याला आपली किडनी देऊ केली.
किडनी ट्रान्सप्लांट दरम्यान अडथळे येऊ नये म्हणून ४१ वर्षीय सामंथाला आपलं वजनही कमी करावं लागलं होतं. ऑक्टोबर २००९ मध्ये हे ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर लाम्बची तब्येत हळूहळू सुधारू लागली होती. या दोघांच्या प्रेमाची कथा संपूर्ण लंडनभर गाजली होती. बीबीसीनंही त्यांची ही कथा `डॉक्युमेंटरी`च्या रुपात प्रेक्षकांसमोर आणली होती.
परंतु, यानंतर मात्र काही विचित्र गोष्टी घडल्या. लाम्बनं आपल्या पत्नीला सोडून इतर स्त्रीसोबत मौज-मस्ती करण्यात व्यस्त झाला. ही दुसरी स्त्री म्हणजे सामंथाची एक मैत्रिण होती. सामंथाच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट २०१२ मध्ये लाम्ब तिच्यापासून दूर झाला.
लॅबच्या अफेअरमुळे सामंथा मात्र प्रचंड दुखावली होती. ` लाम्बला किडनी दिली नसती तर त्याचा केव्हाच मृत्यू झाला असता. त्याला प्रत्येक आठवड्यात डायलिसिसवर टाकण्यात येत होतं. मीच त्याला किडनी ट्रान्सप्लांट करण्याविषयी सुचवलं. परंतु, आता मलाच या गोष्टीचा पश्चाताप होतोय` असं सामंथानं म्हटलंय. आता सामंथाला आपली किडनी परत हवीय. एखाद्या गरजवंताला ती किडनी दान देईन असं तिनं म्हटलंय. लाम्ब आता तिला समोरही नकोसा वाटतोय.
लाम्बनं मात्र आपल्या अफेअरची अफवा असल्याचं म्हटलंय. आपण सामंथाची किडनी घेणारच नव्हतो... कारण, त्यात मोठा धोका होता. परंतु तिनं खूप हट्ट केला म्हणून... आणि याबद्दल आपण तिचे जन्मभर ऋणी राहू असंही त्यानं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.