न्यूयॉर्क : मंगळावर १९७९मध्ये दोन व्यक्ती पाहिल्याचा दावा राष्ट्रीय वैमानिक आणि अंतराळ प्रशासनच्या (नासा) एका माजी कर्मचाऱ्यांने केला आहे. त्याने हा दावा विकिंग मार्स लेंडर या उपग्रहाने पाठविलेल्या छायाचित्रावरुन केला आहे.
आंतरराष्ट्रीय बिझनेस टाइम्स प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जॅकी या महिलेने अमेरिकेच्या कॉस्ट टू कॉस्ट एम रेडिओला सांगताना मंगळ ग्रहावर दोन लोकांना फेरफटका मारताना पाहिल्याचा दावा केला आहे. ही घटना १९७९मधील आहे. उपग्रहाबातचे काम मी पाहत होते, असे तिने सांगितले.
वृत्ताच्या दाव्यानुसार दोन लोकांना फिरताना पाहिले. त्यातील एकाने साधेच कपडे परिधान केले होते. ते दोघे उपग्रहाच्या जवळ होते. मात्र, वैज्ञानिक जसा अंतराळात वेश परिधान करतात, तसा त्यांनी केलेला नव्हता, असे नासाच्या माजी अधिकारी महिलेने सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.