लंडन : ब्रिटनच्या परदेश आणि राष्ट्रकुल कार्यालयानं प्रदर्शित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशासाठी लढणाऱ्या क्रांतीवीरांच्या प्रेरणादायी कहाण्या चित्रीत करण्यात आल्यात. उल्लेखनीय म्हणजे, ज्या इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं त्यांनीच आपल्या या व्हिडिओत भारतीय वीरांचाही उल्लेख केलाय.
'UK digital archive' या नावानं पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीच्या स्मरणार्थ हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आलाय. २०१४ ला पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे पूर्ण झालीत.
सहा भारतीयांचा गौरव
ब्रिटीश राज्यात जे भारतीय सैनिक ब्रिटिश सैनिक दलात होते अशा सहा जणांना पुरस्कार देण्यात आला. या सैनिकांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटनच्या सैन्यात राहून जी उल्लेखनीय कामगिरी केली होती त्याच्या स्मरणार्थ हा गौरव करण्यात आलाय.
या सैनिकांनी 'युनायटेड किंगडम'साठी जे योगदान दिलंय त्या उल्लेखनीय शौर्याकरिता आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत, असं परदेश आणि राष्ट्रकुल कार्यालयाच्या मंत्री ह्युगो स्वयर यांनी म्हटलंय.
6 #Indians were awarded the Victoria Cross in #WW1. Read their remarkable stories here https://t.co/UXn715WdYShttps://t.co/Fyc7HdSoTX
— UK in India (@UKinIndia) June 21, 2016