ww.24taas.com, ओटावा
कॅनडाच्या क्युबेकस्थित तुरुंग दुसऱ्या क्रमांकाचं तुरुंग म्हणून ओळखलं जातं. पण, याच तुरुंगातून दोन कैद्यांनी हॅलिकॉप्टरच्या साहाय्यानं पळ काढला आणि तुरुंग अधिकारी मात्र पाहतच राहिले. ही फिल्मी कहानी नुकतीच प्रत्यक्षात घडलीय.
बेन्जामिन हुडोन बाबरब्यू आणि डॅनी प्रोवेनकल अशी या दोन कैद्यांची नावं आहेत. दुपारी अडीच वाजल्याच्या सुमारास या तुरुंगाच्या वर एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत होतं. योग्य संधी साधून बेन्जामिन आणि डॅनीनं रस्सीच्या साहाय्यानं हॅलिकॉप्टर गाठलं आणि तुरुंग अधिकाऱ्यांच्या देखत ते इथून सटकले.
त्यानंतर पोलिसांनी आजुबाजुच्या संपूर्ण परिसराला घेराव घातला. काही वेळानंतर जवळजवळ ८० किलोमीटर दूर अंतरावर त्यांना हे हेलिकॉप्टर आढळलं. या हेलिकॉप्टरच्या पायलटला आणि पळून गेलेल्या दोघांपैकी एका कैद्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालंय. त्याची चौकशी सुरू आहे. पलायनासाठी वापरण्यात आलेलं हेलिकॉप्टर एका ट्रॅव्हल कंपनीतून पळवण्यात आलं होतं.
कॅनडाचं सेन्ट जिरोम नावाचं हे तरुंग मान्ट्रियलच्या उत्तर पश्चिम भागापासून जवळजवळ ६० किलोमीटर अंतरावर बनवलं गेलंय.